मेष
ओम श्री भानवे नम: हा जप करून दिवसाची सुरूवात करावी. चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – पांढरा
वृषभ
ओम श्री नमः या बीज मंत्राचा जप करणे. चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंड, आप्तेष्टांबरोबर वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगार वाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायात कामगिरी उत्तम राहिल.
आजचा रंग – मरून
मिथुन
आज कालभैरव अष्टक म्हणावे. चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. व्यवसाय, नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवी गाठी-भेटी होतील. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी योग्य दिवस आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – पिवळा
कर्क
ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा. चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वाच्या कामांचे निर्णय घ्यावेत. महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम ग्रहमान. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह
गणपती मंदिरात गुळ खोबरे ठेऊन दिवसाचा प्रारंभ करावा. चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. आर्थिक व्यवहार जपून करावे. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळींनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांशी काळजी घ्यावी.
आजचा रंग – लाल

कन्या
गणपती मंदिरात दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करणे. चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. महत्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग.
आजचा रंग – गुलाबी
तुळ
गणेश अष्टक म्हणून दिवसाची सुरूवात करणे. चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांसाठी निगडीत सुवार्ता समजेल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारव्या लागतील. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग – पांढरा
वृश्चिक
ओम श्री भानवे नमः जप करून दिवसाची सुरुवात करावी. चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायामध्ये उत्तम सहकार्य लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार, नोकरीमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग.
आजचा रंग – आकाशी

धनु
ओम श्री नमः या बीज मंत्राचा जप करणे. चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. प्रवास जपून करावेत. आर्थिक निर्णय घेताना सल्ला-मसलत करावे. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वातविकार आणि उष्णतेचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
आजचा रंग – क्रीम

मकर
कालीमातेचे दर्शन घेणे. चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
ओम क्लिम श्री या मंत्राचा जप करणे. चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वाद-विवाद टाळावेत. कामगारांशी जुळवून घ्यावेत. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
आजचा रंग – जांभळा

मीन
देवी कवचाचे पाठ करावेत. चंद्राचे भ्रमण कर्क राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहिल. दूरच्या प्रवासाचे योग येतील.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu