मेष
श्री बुधाय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

वृषभ
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – पिवळा

मिथुन
कुलदैवताचे स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकाराकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – नारंगी

कर्क
घरांमध्ये तुपाचा दिवसा लावून ओम श्रीं नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राच भ्रमण वृश्चिक राशीत असेल. महत्वकांक्षी निर्णयाचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलाची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पोपटी

सिंह
सकाळी गणपतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – जांभळा

कन्या
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – जांभळा

तुळ
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता ठेवावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक
गणपती मंदिरामध्ये तांबडी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – नारंगी

धनु
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – पांढरा

मकर
शिव मानस पुजेचे वाचन करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – आकाशी

कुंभ
कुलस्वामिनीची ओटी भरावी. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग- निळा

मीन
गणपती अष्टक म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रृकतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – केशरी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu