मेष
ओम श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिक दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे आर्थिक येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहिल. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
आजचा रंग – लाल

वृषभ
गणपतीचे आणि दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. आधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडी- अडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
गणपतीचे आणि दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटुंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – आकाशी

कर्क
ओम श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग लाल आहे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – लाल

सिंह
दत्त महाराजांच्या आणि गणपती मंदिरात फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. पति, पत्नीमधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग – गुलाबी

कन्या
गणपती मंदिरात पांढऱ्या वस्तू अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – राखाडी

तुळ
गणपती मंदिरामध्ये अभिषेक करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदी ग्रहमान राहिल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- राखाडी

वृश्चिक
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिक आणि शेतीशी निगडीत व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान राहिल. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग- हिरवा

धनु
ओम गँ गणपतेय नम: या मंत्राच जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. वादविवाद टाळावेत. व्यवसायांमध्ये मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कम्युडिटी, मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
आजचा रंग – पांढरा

मकर
गणपती मंदिरामध्ये गुळ, खोबऱ्याचा नेवैद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. व्यवसायिक स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. कम्युडिटी शेअर्स शेतीशी निगडीत व्यवसायांना लाभदायक ग्रहमान आहे.
आजचा रंग – हिरवा

कुंभ
गणपती व दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये फुले अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिक दृष्टीने लाभदायक स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – नारंगी

मीन
दत्त महाराजांची उपासना करावी. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय सावधनपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग- राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu