मेष

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. आनंदी ग्रहमान, कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न सोडवू शकाल. राहत्या घरांचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. श्री बुधाय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. भावंडाच्या गाठीभेटी होतील. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. आर्थिक येणी वसुलीसाठी योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलदैवतांचे स्मरण करावे.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजना सुरू करण्यासाठी त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वाच्या कामाचा पाठपुरावा करावा. घरामध्ये तुपाचा दिवा लावून ओम श्री नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – गुलाबी

सिंह

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. सकाळी गणपती दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

कन्या

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. सर्व लाभांच्या दृष्टीने योग्य दिवस. भावंडाच्या भेटी गाठीचे योग. जुने मित्र भेटू शकतील. वेळ आनंदी जाईल. नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

तुळ

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक फायदे होतील. प्रवासाचे योग संभवतात. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. दगदगीचा दिवस. परंतु चांगल्या संधी निर्माण होतील. त्यांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण राहील. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. गणपती मंदिरामध्ये तांबडे फुले अर्पण करावी.
आजचा रंग – पिवळा

धनु

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी कामगारांशी सलोख्याने वागावे. प्रवास जपून करावा. वादविवाद टाळावेत. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

मकर

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. व्यावसायिकांना उलाढालीचे योग. व्यवसायांशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासांचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील. प्रगतीचे योग. शिव मानस पुजेचे वाचन करावे.
आजचा रंग – पिवळा

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. नोकरीमध्ये कामाचा ताणतणाव जाणवेल. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकाराची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक नियोजन जपून करावेत. खर्च संभवतो. कुलस्वामिनीची ओटी भरावी.
आजचा रंग – नारंगी

मीन

आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. धाडसी निर्णयांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवाल. संतती सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. गणपती अष्टक म्हणावे.
आजचा रंग – गडद लाल

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu