News Flash

आजचं राशीभविष्य, गुरूवार, १० जून २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार कुंभ राशींच्या व्यक्तींनी मनातील शंकेचे निरसन करावे. अघळपघळ बोलणे टाळावे. घरातील टापटि‍पी बाबत दक्ष राहावे.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

कुटुंबाचे उत्तम सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाहावा. तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नात यश येईल. कौटुंबिक सौख्यात वृद्धी होईल.

वृषभ:-

दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. कौटुंबिक गोष्टींच्या बाबत आत्मपरिक्षण करावे. कामाच्या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. काही कामे तुमचा कस पाहतील.

मिथुन:-

सामाजिक कामात सक्रिय राहाल. तुमच्यातील मित्र भावना वाढीस लागेल. प्रत्येक बाबतीत जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कष्टाला मागेपुढे पाहू नका. मानसिक ताण जाणवेल.

कर्क:-

तुमच्या मनातील सर्व आकांक्षा पूर्ण होतील. व्यावसायिक आघाडीवर सक्रियता वाढेल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल.

सिंह:-

आत्मविश्वासाने यश मिळवता येईल. प्रयत्नातून नवीन दिशा ठरवाल. वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. तरूणांशी मैत्री वाढेल. योजनेनुसार कामे पार पडतील.

कन्या:-

जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. कामाच्या व्यापाने खचून जाऊ नका. भागीदाराशी संयमाने वागावे लागेल. हितशत्रू पासून सावध राहावे. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

तूळ:-

रेस-जुगारातून लाभ संभवतो. तुमच्या मनातील आनंद द्विगुणित होईल. पचनाच्या किरकोळ तक्रारी संभवतात. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. नोकरांना चलाखीने सांभाळावे लागेल.

वृश्चिक:-

जोखीम सावधगिरीने उचलावी. कोणाशीही वाटाघाटी करताना सावध राहावे. जोडीदाराविषयीच्या प्रेम सौख्याला बहार येईल. आपले मत व्यवस्थित पट‍वून द्यावे. भागीदारीतून चांगला नफा मिळवाल.

धनू:-

जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. आर्थिक चढ-उतार संभवतात. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. केलेल्या कामातून आपण समाधानी असाल.

मकर:-

घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. प्रेमप्रकरणाला चांगली दिशा मिळेल. प्रवासात कसलाही हलगर्जीपणा करू नका. इतरांवर फार विसंबून राहू नका. जुगाराची आवड जोपासाल.

कुंभ:-

मनातील शंकेचे निरसन करावे. अघळपघळ बोलणे टाळावे. घरातील टापटि‍पी बाबत दक्ष राहावे. मागचा पुढचा विचार न करता खर्च करू नये. नवीन जबाबदारीची  जाणीव ठेवाल.

मीन:-

आततायीपणे निर्णय घेऊ नका. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. निसर्गसौंदर्याचा अनुभव घ्याल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:00 am

Web Title: horoscope today 10 june 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, बुधवार, ९ जून २०२१
2 आजचं राशीभविष्य, मंगळवार, ८ जून २०२१
3 आजचं राशीभविष्य, सोमवार, ७ जून २०२१
Just Now!
X