मेष :-

गैरसमजुतीतून त्रास संभवतो. डोळ्यांची तपासणी करावी लागेल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ :-

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेमाच्या दृष्टीने मैत्रीत सुधारणा होईल. काही कौटुंबिक चिंता सतावतील. मनाजोगी खरेदी करता येईल. हौस भागवणे शक्य होईल.

मिथुन :-

मानसिक आंदोलनाला आवर घालावी. मनातील विचित्र कल्पना काढून टाका. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील. महत्त्वाची कामे आज टाळावीत.

कर्क :-

फार विचार करत बसू नका. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. डोळे झाकून कोणतेही कृत्य करू नका. फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक चंचलता जाणवेल.

सिंह :-

आर्थिक लाभावर लक्ष केंद्रीत करा. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. मिळालेल्या लाभाबाबत समाधानी रहा. इतरांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करा.

कन्या :-

विशाल दृष्टिकोन ठेवावा लागेल. कलेला पोषक वातावरण मिळेल. तुमच्यातील सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळेल. भौतिक सुखापासून दूर राहाल. पत्नीचे वर्चस्व जाणवेल.

तूळ :-

कमी श्रमातून चांगला लाभ होईल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. अपचनाचा त्रास जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा लाभ मिळेल.

वृश्चिक :-

नवीन कामात सावधानता बाळगा. कौटुंबिक कामात विशेष लक्ष घालावे लागेल. प्रणयराधनेत सक्रियता वाढेल. आर्थिक लाभापेक्षा कामाचा आनंद मिळवाल. भागिदारीतून मनाजोगा नफा मिळेल.

धनू :-

कष्टाला मागेपुढे पाहू नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराविषयी गैरसमज वाढू शकतात. हाताखालील नोकरांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

मकर :-

जवळच्या प्रवासात काळजी घ्या. भावंडांशी दुरावा वाढू शकतो. प्रेमसौख्याला अधिक बहार येईल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून खटके उडू शकतात. करमणुकीत अधिक वेळ घालवाल.

कुंभ :-

बौद्धिक कामात सक्रिय राहाल. धार्मिक यात्रांचे आमंत्रण घेऊ नये. घरातील वातावरण प्रसन्न राहील. रेस-जुगारातून नुकसान संभवते. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.

मीन:-

आपलेच म्हणणे खरे कराल. अती आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. उघड-उघड शत्रुत्व पत्करू नका. जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. किरकोळ दुखापत संभवते.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope today 12 june 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr
First published on: 12-06-2021 at 01:00 IST