News Flash

आजचं राशीभविष्य, मंगळवार, १५ जून २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींनी विचारांना योग्य दिशा द्यावी. कोणत्याही गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाही.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष :-

मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. दिवस फारसा अनुकूल नाही. अधिक मेहनतीची गरज भासेल. कामाचे योग्य नियोजन करा.

वृषभ:-

वायफळ गोष्टींपासून दूर रहा. फक्त आपल्या कामावरच लक्ष केंद्रीत करावे. मैत्रीत सलोखा ठेवावा. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. सकारात्मक विचार करावेत.

मिथुन:-

नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. काम वेळेवर पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. अति घाई करून चालणार नाही. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा लागेल. अचानक आलेल्या समस्येतून मार्ग निघेल.

कर्क:-

विचारांना योग्य दिशा द्यावी. कोणत्याही गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाही. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.

सिंह:-

आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. अधिकारी वर्गाचे सहाय्य लाभेल. मैत्रीचे नवीन संबंध प्रस्थापित होतील. इतरांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला चांगल्या बातमीची प्रतीक्षा राहील.

कन्या:-

आर्थिक लाभाबाबत सतर्क राहावे. मानभंगाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराचा तुमच्यावर वचक राहील. डोक्यात काहीसा गोंधळ चालू राहील. सरकारी कामे अडकून पडू शकतात.

तूळ:-

महत्त्वपूर्ण लोकांशी ताळमेळ जुळून येईल. आर्थिक स्थितीचा विचार कराल. नवीन जबाबदारी सामोरी येईल. चांगल्या गुंतवणुकीला वाव आहे. दिवसभर कामात व्यग्र राहाल.

वृश्चिक:-

काही निर्णय अचानक घ्यावे लागू शकतात. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. मुलांची काळजी लागून राहील. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. पारमार्थिक कामात सहकार्य कराल.

धनू:-

फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. नवीन लोकांसोबत चर्चा कराल. भावनांवर संयम ठेवावा. घरातील वातावरण शांततामय ठेवावे. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा.

मकर:-

चिकाटी सोडून चालणार नाही. जवळच्या प्रवासात अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. काही गोष्टीत धीर धरावा लागेल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.

कुंभ:-

हाताखालील लोकांवर लक्ष ठेवा. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. मनातील संकोच काढून टाकावा. बोलतांना शब्द जपून वापरावेत. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे.

मीन:-

अति घाई त्रासदायक ठरू शकेल. आपल्या अपेक्षा संतुलित ठेवा. क्षुल्लक कारणावरून चिडचिड करणे टाळा. जवळचे मित्र मदत करतील. घरगुती कामात अधिक लक्ष घालावे.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 1:00 am

Web Title: horoscope today 15 june 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, सोमवार, १४ जून २०२१
2 आजचं राशीभविष्य, रविवार, १३ जून २०२१
3 आजचं राशीभविष्य, शनिवार, १२ जून २०२१
Just Now!
X