मेष:-

सकारात्मक उर्जेने काम करावे. कौटुंबिक पाठिंबा मिळेल. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. आजचा दिवस शुभ आहे. मानसिक गोंधळाला आवर घालावी.

वृषभ:-

संयमाची गरज भासेल. अडचणीतून मार्ग काढता येईल. समोरील गोष्टींचा आनंद घ्याल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. अनावश्यक खर्च टाळावेत.

मिथुन:-

बोलतांना संयम राखावा. मनातील चुकीचे विचार बदलून टाका. कौटुंबिक जबाबदारी ठामपणे पेलावीत. आत्मविश्वास कायम ठेवा. कामात घाई गडबड करू नका.

कर्क:-

थोरांचे विचार जाणून घ्या. भावंडांचे सहकार्य मिळेल. जवळचे मित्र भेटतील. मानसिक ओढाताण जाणवू शकते. ध्यानधारणेतून सकारात्मक ऊर्जा मिळवा.

सिंह:-

सडेतोडपणे वागून चालणार नाही. मनाची द्विधावस्था होणार नाही याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वातावरण सुखकर राहील. योग साधनेकडे मन वळवावे. वैचारिक स्पष्टता ठेवा.

कन्या:-

ठरवलेल्या गोष्टी पार पाडाव्यात. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. वेळच्या  वेळी निर्णय घ्यावेत. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

तूळ:-

वैचारिक एकसूत्रता ठेवावी. मनाच्या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडावे. उगाच चिंता करत बसू नका. वादाचे प्रसंग टाळावेत. चांगली संगत लाभेल.

वृश्चिक:-

कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी.  उगाचच चिडचिड करून चालणार नाही. मानसिक शांतता लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

धनू:-

जुनी गुंतवणूक कामी येईल. मन प्रसन्न राहील. नवीन योजनांवर विचार करावा. जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा गोष्टी कराल. एकमेकातील वैचारिक दुरावा मिटेल.

मकर:-

चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. जोडीदाराशी मतभेद संभवतात. दिवस आळसात घालवून चालणार नाही. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

कुंभ:-

योग्य तर्क वापरावा लागेल. भांडणापासून दूर राहावे. तडकाफडकी कोणतीही कृती करू नका. मनातील नकारात्मक विचार काढून टाकावेत. नामस्मरण करणे हिताचे ठरेल.

मीन:-

वाहन वेगावर मर्यादा घालावी. संयम सोडून वागू नका. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. अनावश्यक खर्च टाळावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर