मेष:-

स्वपराक्रमाने कार्य सिद्धीस न्याल. नवीन कामास दिवस अनुकूल आहे. जुने करार मार्गी लागतील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गृह सजावटीच्या वस्तू खरेदी कराल.

वृषभ:-

अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. आपल्या स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी उपयोग होईल. नवीन योजनेवर काम चालू करावे. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. सामाजिक बांधीलकी जपावी.

11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
| mangal gochar 2024 mars transit in aries these zodiac sign get more profit
एका वर्षानंतर मंगळ ग्रह करणार मेष राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना नशीब देईल साथ, धन-संपत्तीत होईल वाढ
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व
Rahu And Shukra Conjunction
होळीनंतर राहू-शुक्रची होणार युती! या राशीच्या लोकांच्या आयुष्यात येईल आनंद, धनलाभासह मिळेल नव्या नोकरीची संधी

मिथुन:-

आपल्या कर्तबगारीवर कामे मिळवाल. छोटे प्रवास घडतील. रचनात्मक काम करण्यावर भर द्यावा. अतिविचारात अडकून पडू नका. वरिष्ठ सहकार्‍यांचे चांगले सहकार्य लाभेल.

कर्क:-

अति चौकसपणा दाखवू नका. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. मेहनतीचे तत्काळ फळ मिळेल. घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल.

सिंह:-

आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल. आपल्या व्यासंगाचा फायदा होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल.

कन्या:-

आपले विनयशील वागणे लोकांना आवडेल. योग्य शिस्तीचा फायदाच होईल. भावंडांशी चर्चेतून मार्ग काढावा. कामाचा ताण जाणवेल. कार्यालयातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल.

तूळ:-

हातातील काम शेवटपर्यंत लावून धरा. तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. गोड बोलून कामे साध्य करून घ्याल. काही समस्या चर्चेतून सोडवाव्या. नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल.

वृश्चिक:-

जुन्या प्रश्नातून मार्ग काढावा. अतिमसालेदार पदार्थ खाऊ नका. कामाच्या नवीन संधीचा फायदा घ्या. नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावे. उत्साहाने कार्यरत राहाल.

धनू:-

कार्य पूर्ण करण्यात कुशलता मिळवाल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चुकून एखाद्यावर अति विश्वास ठेवाल. जोखीम पत्करल्यास लाभ मिळू शकतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

मकर:-

हातातील कामांची यादी पूर्ण होईल. घरातील काही खर्च निघतील. तज्ञांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

कुंभ:-

कल्पनेतून बाहेर येऊन कामाला लागावे. जुन्या कामावर खर्च होईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. समाजसेवा करण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी मतभेद दूर होतील.

मीन:-

सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. खर्चाचा अंदाज बांधावा. व्यापारातील जोखीम सकारात्मक परिणाम देईल. सर्व समस्या टप्याटप्याने सुटतील. जोडीदाराच्या भावनेचा व मतांचा आदर करावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर