News Flash

आजचं राशीभविष्य, शनिवार, १७ जुलै २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्तींनी कामात धरसोडपणा करू नका. दिवसभर कामाची धांदल राहील.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतील. आजचा दिवस आनंददायी ठरेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. मौजमजेत वेळ घालवाल. कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल.

वृषभ:-

शांत चित्ताने कामे करावीत. कलहाचे प्रसंग टाळावेत. आरोग्य चांगले राहील. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. कामात मन रमेल.

मिथुन:-

शब्दाने शब्द वाढवू नका. वैचारिक ताण घेऊ नका. बौद्धिक हटवादीपणा टाळावा. बोलतांना संयम सोडू नका. चांगल्या कामासाठी अधिक वेळ काढावा.

कर्क:-

गोड बोलून कामे करून घ्याल. घरातील वातावरण खेळकर राहील. घरगुती कामात अधिक वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वादाचे प्रसंग समजुतीने हाताळा.

सिंह:-

मनातील इच्छाशक्ति प्रबळ ठेवा. आज बरीच कामे हातावेगळी करता येतील. यश पदरात पडून घ्याल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य वाढेल.

कन्या:-

कामात धरसोडपणा करू नका. दिवसभर कामाची धांदल राहील. कौटुंबिक गोष्टींसाठी वेगळा वेळ काढावा लागेल. इतरांना मदत करण्यात आनंद वाटेल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल.

तूळ:-

मनात हेतु ठेवून कामे कराल. मोठ्या योजनांची आखणी कराल. मनाच्या मर्जीला अधिक महत्त्व द्याल. दिवस चैनीत घालवाल. आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे.

वृश्चिक:-

सडेतोड उत्तरे द्याल. दिवस काहीसा धावपळीत जाईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. येणी वसूल करावी लागतील. काही निर्णय घेताना त्रस्तता जाणवेल.

धनू:-

माणसे ओळखून वागावे. अध्यापक वर्ग दिवसभर कामात गर्क राहील. नोकरदार वर्गाला लाभ होईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ मिळवता येईल. अधिकारात वाढ होईल.

मकर:-

कामाची योग्य रूपरेखा ठरवावी. सहकार्याने कामे करावीत. हातातील अधिकार वापरता येतील. स्वावलंबनाची कास धरावी. पोटाचे त्रास संभवतात.

कुंभ:-

लोक निंदेला घाबरू नका. अति शिस्तीचा बडगा करू नका. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. भडक शब्दांचा वापर टाळावा लागेल.

मीन:-

हित शत्रूंवर मात करू शकाल. अचानक धनलाभाची शक्यता. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. पित्त विकारांचा त्रास संभवतो. खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळावीत.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 1:00 am

Web Title: horoscope today 17 july 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, १६ जुलै २०२१
2 आजचं राशीभविष्य, गुरूवार, १५ जुलै २०२१
3 आजचं राशीभविष्य, बुधवार, १४ जुलै २०२१