News Flash

आजचं राशीभविष्य, गुरूवार, १७ जून २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार कन्या राशींच्या व्यक्तींनी उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. वादाच्या मुद्द्यापासून दूर राहावे.

Horoscope Today Daily Horoscope Rashi Bhavishya in Marathi
सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

कौटुंबिक चर्चेला प्राधान्य द्यावे. घरात काही नवीन बदल करण्याचा विचार कराल. कामातून मनाजोगे समाधान लाभेल. आळस झटकून टाकावा. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.

वृषभ:-

परदेशातील आप्तांकडून शुभ वार्ता मिळतील. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. प्रत्येक गोष्टीचा रसास्वाद घ्याल. जवळच्या मित्राची नाराजी दूर करावी. मधुर वाणीने सर्वांना जिंकून घ्यावे.

मिथुन:-

उगाचच निषेध नोंदवायला जाऊ नका. बौद्धिक चर्चेत सहभाग घ्याल. स्वत:चे मत ठसवून सांगा. अती चिकित्सा करू नका. वेळेचे योग्य नियोजन करा.

कर्क:-

कौटुंबिक कामातून आनंद मिळेल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. मनाजोगी खरेदी करता येईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. तब्येतीत सुधारणा होईल.

सिंह:-

लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कलेचे कौतुक केले जाईल. नवीन लोक संपर्कात येतील.

कन्या:-

उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. वादाच्या मुद्द्यापासून दूर राहावे. पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल. सकारात्मक विचारांची जोड द्यावी.

तूळ:-

आजचा दिवस चांगला जाईल. कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील. उत्साह कमी पडू देऊ नका. नातेवाईकांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल.

वृश्चिक:-

नवीन कामातून समाधान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वैवाहिक सौख्याने सुखावून जाल. छोट्या प्रवासाचे बेत आखाल. काही किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील.

धनू:-

अडचणीतून मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे. कौटुंबिक खर्च वाढू शकतात. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

मकर:-

धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. घरातील वातावरण मंगलमय राहील. भावंडांची चिंता लागून राहील. निरूत्साही भावना काढून टाका. शांत व संयमी विचार करावा.

कुंभ:-

संपर्कातील लोकांची मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवून विचार कराल. घरातील स्वच्छतेबाबत दक्षता बाळगाल. बागकामाची आवड जोपासाल.

मीन:-

क्रोध वृत्तीला आवर घालावी. जोमाने कामे पूर्ण कराल. मेहनतीला कमी पडू नका. सारासारविचार करून वागणे ठेवा. स्वतंत्र वृत्तीचा आग्रह धराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 1:00 am

Web Title: horoscope today 17 june 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, बुधवार, १६ जून २०२१
2 आजचं राशीभविष्य, मंगळवार, १५ जून २०२१
3 आजचं राशीभविष्य, सोमवार, १४ जून २०२१
Just Now!
X