मेष:-

तिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. दुसर्‍यावर हुकूमत गाजवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कुटुंबा समवेत वेळ उत्तमपणे घालवाल. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल.

वृषभ:-

कामाच्या ठिकाणी मानाचा दर्जा मिळेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून वागावे. जुनी कामे प्राधान्याने पूर्ण करा. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा दिनक्रम व्यस्त राहील. भागीदारीच्या बाबतीत सारासार विचार करा.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

मिथुन:-

हट्टीपणे वागू नका. बुद्धिमत्तेचे दर्शन घडवा. अनेक कामे हातावेगळी कराल. मात्र घाईने समस्या ओढवून घेऊ नका. कामाचा प्राधान्यक्रम लक्षात घ्या.

कर्क:-

भागीदारीत फायदा होईल. खेळ आणि आरामात बराच काळ घालवाल. अनेक कामे अंगावर पडू शकतात. जबाबदार्‍यांचा ताळमेळ सांभाळावा. शक्यतो वादविवादात पडू नका.

सिंह:-

दुसर्‍यास समजून सांगण्याची हातोटी निर्माण कराल. निराशेचे बळी होऊ नका. वाहनाची समस्या उद्भवू शकते. प्रतिकुलतेत संयम बाळगावा. कुटुंबात मान सन्मान प्राप्त होतील.

कन्या:-

भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा. कौटुंबिक जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करू नका. अतिकामाचा थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

तूळ:-

इतरांशी व्यवहाराने वागाल. समस्यांचे निराकरण सक्षमतेने कराल. निराश न होता परिस्थिती हाताळा. कामावर लक्ष केंद्रीत करावे. प्रिय व्यक्तीचा रूसवा दूर करावा लागेल.

वृश्चिक:-

अतिसाहस करू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दुसर्‍याची मानसिकता समजून घ्या. जबाबदारी पार पडताना थकून चालणार नाही. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

धनू:-

तुमच्या प्रेमळ स्वभावाचा गैर फायदा घेऊ देऊ नका. तुमच्या शक्तीची लोकांना कल्पना येईल. घरातील अतिरिक्त कामे अंगावर पडतील. नियोजनाने वाटचाल करावी. रागावर नियंत्रण ठेवा.

मकर:-

शांतता व संयम बाळगा. आत्मविश्वास वाढीस लागेल असे काम करा. दिवस मनाजोगा घालवाल. काही कामे नाईलाजाने करावी लागतील. स्वयंपाक करताना खबरदारी घ्यावी.

कुंभ:-

गूढ गोष्टींबद्दल आवड वाटेल. नवीन लोकांशी मैत्री कराल. सकारात्मक विचार करावेत. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. प्रवासात सावधानता बाळगा.

मीन:-

दिवस उत्साहात व आनंदात जाईल. अचानक धनलाभाचे योग. जोडीदाराची प्रगती होईल.  परदेशात जाण्याची संधी चालून येईल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर