News Flash

आजचं राशीभविष्य, शुक्रवार, १८ जून २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार तूळ राशींचे व्यक्ती अत्यंत कुशलतेने वागतील. तुमच्या वक्तृत्वावर लोक प्रभावित होतील

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

केलेल्या कामातून समाधान मिळेल. योग्य तर्क वापरता येईल. आपले विचार चलाखीने मांडाल. काही गोष्टींचे चिंतन करावे. लहान प्रवासाचा योग येईल.

वृषभ:-

गोड बोलण्यावर अधिक भर द्याल. सांपत्तिक दर्जा सुधारेल. कमिशनमधून चांगली कमाई होईल. बौद्धिक छंद जोपासायला वेळ काढाल. व्यावहारिक बुद्धिमत्ता वापराल.

मिथुन:-

बौद्धिक हटवादीपणे  वागणे राहील. तत्परतेने कामे करण्यावर भर द्याल. जबाबदारीचा एकंदर आवाका लक्षात घ्यावा. हसतहसत कामे साधून घ्या. अती  श्रमामुळे थकवा जाणवेल.

कर्क:-

सरकारी कामात अधिक वेळ जाईल. मनातील निराशाजनक विचार दूर करावेत. आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शनाखाली करावी. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कौटुंबिक खर्च आवरता ठेवावा.

सिंह:-

तरूणांशी मैत्री कराल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्यावा. वरिष्ठांच्या संपर्कात राहाल. चारचौघांत तुमच्या गुणांचे कौतुक केले जाईल. तब्येतीची योग्य वेळी तपासणी करावी.

कन्या:-

आपल्या आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. बुद्धिचातुर्याने कामे करण्यावर भर द्याल. व्यवहारात चतुरता दाखवून द्याल. पुढील परिस्थितीचा अंदाज बांधा. लेखन क्षेत्रातील लोकांना मान-सन्मान लाभेल.

तूळ:-

अत्यंत कुशलतेने वागाल. तुमच्या वक्तृत्वावर लोक प्रभावित होतील. प्रवासाची आवड पूर्ण होईल. चांगले साहित्य वाचनात येईल. योग्य कल्पनाशक्ति वापराल.

वृश्चिक:-

कफ विकाराचा त्रास संभवतो. मनातील इच्छेला मुरड घालू नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. आपले स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडाल. संपर्कातील लोकांशी जिव्हाळा वाढेल.

धनू:-

तुमचा बौद्धिक कस लागू शकतो. मनाची द्विधावस्था टाळण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या व्यवसायात व्यवहार कुशलता दाखवावी. जोडीदाराविषयी मनात गैरसमज बाळगू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

मकर:-

इतरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा. वादाच्या मुद्दयात सहभाग घेऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक गोष्टींची आवड जोपासता येईल. कल्पनाशक्तीला वाव देता येईल.

कुंभ:-

तुमचे बुद्धी-कौशल्य पणाला लागू शकते. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा. भडक शब्दांचा वापर टाळावा. आवडते पदार्थ खाण्याबाबत आग्रही राहाल.

मीन:-

गप्पागोष्टी करण्यात अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. हट्टीपणा थोडा कमी करावा लागेल. नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 1:00 am

Web Title: horoscope today 18 june 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, गुरूवार, १७ जून २०२१
2 आजचं राशीभविष्य, बुधवार, १६ जून २०२१
3 आजचं राशीभविष्य, मंगळवार, १५ जून २०२१
Just Now!
X