News Flash

आजचं राशीभविष्य, सोमवार, २१ जून २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार मकर राशींच्या व्यक्तींचा कामाचा वेग वाढेल. तुमची चिकाटी सर्वांच्या नजरेत येईल.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

हाती घेतलेल्या कामाला गती येईल. नवीन लोकांच्या संपर्कात याल. जोडीदाराबाबत समाधानी असाल. सामुदायिक बाबींचा फार विचार करू नका. आवडीचे पदार्थ चाखाल.

वृषभ:-

नोकरी संदर्भातील प्रस्ताव लक्षात घ्या. कौटुंबिक गोडी वाढवाल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. जमिनीच्या कामात अधिक वेळ जाईल.

मिथुन:-

दुर्लक्षितपणे वागून चालणार नाही. कामाच्या बाबतची स्थिती आवाक्यात येईल. आपल्या मतावर ठाम राहाल. सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न कराल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.

कर्क:-

कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. कामातील त्रुटी भरून काढाव्या. अतिहट्ट बरा नाही. वैचारिक स्थिरता जपावी.

सिंह:-

नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल. जवळचा प्रवास कराल. भावंडांशी संबंध सुधारतील. आवडता छंद जोपासाल. कामात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कन्या:-

आध्यात्मिक गोष्टींकडे मन वळवा. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. सरकारी कामांना गती येईल. विशाल दृष्टीकोन बाळगाल. जोडीदाराशी खटके उडू शकतात.

तूळ:-

दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करण्याकडे अधिक कल राहील. तुमच्यातील खेळकरपणा वाढेल. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष घाला. इतरांना आपल्याकडे आकर्षित कराल.

वृश्चिक:-

मानसिक चंचलता जाणवेल. अतिविचार करण्यात वेळ वाया जाईल. भागीदारीत गुंतवणूक कराल. योग्य ठोकताळ्याचा वापर करावा. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

धनू:-

संघर्षमय स्थिती टाळावी. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील. पारंपरिक कामातून यश मिळेल. व्यावसायिक अडचणींकडे अधिक लक्ष द्या.

मकर:-

कामाचा वेग वाढेल. तुमची चिकाटी सर्वांच्या नजरेत येईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना प्रतिष्ठा लाभेल. तब्येतीची काळजी घ्यावी.

कुंभ:-

समजूतदारपणे विचार करावा. बोलतांना सारासार गोष्टी लक्षात घ्याव्यात. आवश्यकता असेल तरच खर्च करावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. घरासाठी नवीन खरेदी कराल.

मीन:-

निर्णयावर ठाम राहावे. संपूर्ण विचारांती काम हाती घ्यावे. कामाचे चढउतार लक्षात घ्या. नसत्या गोष्टींच्या मागे लागू नका. गप्पा गोष्टींची आवड पूर्ण होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 1:00 am

Web Title: horoscope today 21 june 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, रविवार, २० जून २०२१
2 आजचं राशीभविष्य, शनिवार, १९ जून २०२१
3 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, १८ जून २०२१
Just Now!
X