News Flash

आजचं राशीभविष्य, शुक्रवार, २३ जुलै २०२१

आजच्या राशीभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींनी दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा. मुद्दलावर ध्यान द्यायला हवे.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष:-

डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेऊ नका. जुने ताण संपतील. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनातील मधुरता वाढेल. दिवस बर्‍यापैकी अनुकूल राहील.

वृषभ:-

वाढीव कामातून लाभ मिळेल. कामात युक्ति वापरावी लागेल. आजच दिवस व्यस्त राहील. नोकरदारांनी बदलांकडे लक्ष ठेवावे. जवळच्या व्यक्तीच्या मदतीचा लाभ होईल.

मिथुन:-

तांत्रिक कामात यश येईल. कामे जलद गतीने पार पडतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. अधिकारी व्यक्तींच्या संपर्कात याल. दिवसाची सुरुवात उत्तम होईल.

कर्क:-

गरज लक्षात घेऊन काम करावे. घाईने निर्णय घेऊ नका. मेहनतीला मागे हटू नका. आत्ममग्न राहाल. वरिष्ठांची नाराजी लक्षात घ्या.

सिंह:-

हिशोबाच्या बाबतीत चोख राहावे. चुकीच्या सवयींपासून दूर राहावे. मोहाला बळी पडू नका. अनावश्यक चिंतेला दूर सारावे. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.

कन्या:-

एकमेकात तुलना करू नका. मुलांशी हितगुज कराल. घरात छोटासा धार्मिक कार्यक्रम कराल. रागावर नियंत्रण ठेवावे. अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

तूळ:-

साहसी कामे करतांना सावध राहावे. पोटाची तक्रार जाणवेल. कामानिमित्त प्रवास घडेल. दिवस धावपळीत जाईल. समस्यांचे निराकरण न झाल्याने मन खट्टू होईल.

वृश्चिक:-

योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या. मनातील नकार काढून टाका. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. मुलांचा विरोध जाणवू शकतो. वडीलधार्‍यांचा सल्ला घ्यावा.

धनू:-

कामाचा ताण हलका होईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. बदलातून काही अपेक्षित मार्ग सापडेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. जुनी येणी वसूल होतील.

मकर:-

त्वचा विकारांकडे लक्ष ठेवा. अति भावनिक होऊ नका. योग्य संधीची वाट पहावी. खर्च वाढू शकतो. प्रवासात निष्काळजीपणा करू नका.

कुंभ:-

शा‍ब्दिक चकमक टाळावी. कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्या. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. प्रेमातील जवळीकीत सावध रहा. मनातील इच्छा पूर्ण होईल.

मीन:-

दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा. मुद्दलावर ध्यान द्यायला हवे. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. यशाने उत्साह वाढीस लागेल. उत्तम संधीने मन प्रसन्न होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 1:00 am

Web Title: horoscope today 23 july 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, गुरूवार, २२ जुलै २०२१
2 आजचं राशीभविष्य, बुधवार, २१ जुलै २०२१
3 आजचं राशीभविष्य, मंगळवार, २० जुलै २०२१
Just Now!
X