News Flash

आजचं राशीभविष्य, शनिवार, ५ जून २०२१

आजच्या राशिभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्तींना शेअर्स मधून चांगला लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित कामांमधून त्यांचा आर्थिक मान वाढेल. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंगही येऊ शकतात.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष

नवीन कामाचा बोझा अंगावर पडू शकतो. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. आर्थिक कमतरता भरून निघेल. मानसिक चंचलता दूर करावी.

वृषभ

मनाजोगी खरेदी करता येईल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पहाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चारचौघांना प्रेमाने आपलेसे कराल. व्यावसायिक लाभाने सुखावून जाल.

मिथुन

कामाचा व्याप वाढू शकतो. भावंडांची जबाबदारी अंगावर पडेल. अती कामामुळे बौद्धिक ताण जाणवेल. गोष्टी एकाच जागी खिळून पडल्यासारख्या वाटतील. क्षणिक मोहाला बळी पडू नका.

कर्क

जवळच्या मित्र-मैत्रिणींची गाठ पडेल. बर्‍याच दिवसांची इच्छा आज पूर्ण होईल. मानापमानाच्या प्रसंगांनी डगमगू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. सामाजिक सेवेत हातभार लावाल.

सिंह

शेअर्स मधून चांगला लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित कामांमधून आर्थिक मान वाढेल. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. मनातील भलते सलते विचार काढून टाका. तुमच्यातील छुपे कलागुण सर्वांसमोर येतील.

कन्या

जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहार येईल. मैत्रीचे संबंध अधिक घनिष्ट होतील. नियमांचे उल्लंघन करून चालणार नाही. पित्त विकारात वाढ संभवते. हातापायाला किरकोळ दुखापत होऊ शकते.

ग्रहांचे पाठबळ सध्या पूरक नसले तरी वाईटही नाही.

तूळ

क्षुल्लक गोष्टींवरून चीडचीड कराल. मुलांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील कौशल्य पणाला लागेल. जुगाराची आवड पूर्ण कराल. आळस झटकून कामे करावी लागतील.

वृश्चिक

रेस, जुगारातून धनलाभ संभवतो. जमिनीच्या कामातून काही प्रमाणात लाभ होईल. वरिष्ठांशी मतभेदाचे प्रसंग टाळावेत. शांत व संयमी विचार करावा. आपली संगत एकवार तपासून पहावी.

धनू

जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. समोरील कामे आधी पूर्ण करावीत. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून खटका उडू शकतो. घरगुती कामात दिवसभर गुंतून पडाल. काही खर्च अचानक सामोरे येतील.

मकर

क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. आर्थिक गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

कुंभ

हलका व सकस आहार घ्यावा. वादाचे प्रसंग चिघळू शकतात. जोडीदाराशी समजुतीने वागावे लागेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक गोष्टीपासून दूर राहू नका.

मीन

दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. कामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर द्या. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. आवडत्या कलेचा आनंद घ्याल.

 

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2021 1:00 am

Web Title: horoscope today 5 june 2021 daily astrology rashi bhavishya in marathi
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, ४ जून २०२१
2 आजचं राशीभविष्य, गुरूवार, ३ जून २०२१
3 आजचं राशीभविष्य, बुधवार, २ जून २०२१
Just Now!
X