30 September 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, २९ मार्च २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. बोलतांना वाणीत गोडवा ठेवाल. गायक लोकांचे कौतुक केले जाईल. झोपेचे तक्रार जाणवेल. चटपटीत पदार्थ चाखाल.

वृषभ:-सर्वजण तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची वागणूक प्रेमळपणाची असेल. आल्या-गेल्याचे उत्तम स्वागत कराल. गोड बोलून कार्यभाग साधता येईल. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका.

मिथुन:-चैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढेल. जोडीदाराच्या सौख्यात रममाण व्हाल. स्पष्टपणे बोलणे टाळावे. फसवणुकीपासून सावध सहा. मानसिक चंचलता जाणवेल.

कर्क:-मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मुलांच्या कला गुणांचे कौतुक कराल. हौस मौज पूर्ण करून घ्याल. स्त्रियांच्या सहवासात वावराल.

सिंह:-कामे मनाजोगी पार पडतील. मुलांच्या प्रगतीचे कौतुक कराल. जोडीदाराबरोबर मनमोकळी चर्चा कराल. काही कामे अकारण खोळंबतील. वात-विकाराचा त्रास जाणवेल.

कन्या:-परोपकाराचे महत्व समजून घ्याल. धार्मिक कामांत हातभार लावाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सर्वांना सहृदयतेने मदत कराल. नातेवाईकांशी विसंवाद टाळावा.

तूळ:-कामातून समाधान शोधाल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळच्या नातेवाईकांची नाराजी दूर करावी. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत.

वृश्चिक:-गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. मित्र-मंडळींचा गोतावळा जमा कराल. उत्तम गृह सौख्य लाभेल. पत्नीचे विचार आग्रही वाटू शकतात. प्रेमप्रकरणात जवळीक वाढेल.

धनू:-नोकर-चाकरांचे सौख्य मिळेल. भावंडांची मदत घेता येईल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. आपल्या काही गोष्टींचे परिक्षण करावे.

मकर:-व्यावहारिक बुद्धिमत्ता वापरावी. काही गोष्टींचा सारासार विचार करावा. फार खोलात जाऊन अर्थ काढू नयेत. हातात नवीन अधिकार येतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल.

कुंभ:-अभ्यासू वृत्तीने गोष्टी समजून घ्याल. तुमचा अंदाज बरोबर ठरेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. सामुदायिक भानगडीत लक्ष घालू नका. नसत्या वादविवादांमध्ये अडकू नका.

मीन:-मित्रांशी मतभेद संभवतात. दिवसभर कामात व्यग्र राहाल. कानाच्या विकारांवर वेळीच उपाय करावेत. कष्टाला मागे पुढे पाहू नका. फसव्या लोकांपासून दूर राहावे.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 1:00 am

Web Title: web title daily horoscope astrology in marathi sunday 29th march 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, २८ मार्च २०२०
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २७ मार्च २०२०
3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २६ मार्च २०२०
Just Now!
X