Horoscope Today 1 August 2026 In Marathi : आज १ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्ल पक्षातील जेष्ठ महिन्यातील तृतीया तिथी असणार आहे. आज शतभिषा नक्षत्र जागृत असेल आणि शोभन योग जुळून येईल. राहू काळ ९ वाजून ०० मिनिटांनी सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजात मुहूर्त १२ वाजून ०० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस असणार आहे. तुमच्या आयुष्यात आज कोणत्या चांगल्या व वाईट गोष्टी घडणार चला जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, १ ऑगस्ट २०२६ (Daily Horoscope 1 August 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
स्वत:मध्ये जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस मनाप्रमाणे घालवावा. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. गरजूंना मदत कराल.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
मानसिक व्यग्रता जाणवेल. कौटुंबिक सौख्याचा विचार कराल. व्यावसायिक अडचण मिटवाल. चांगल्या कामाची योजना आखाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
आर्थिक व्यवहार पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहील. घरातील ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. अनावश्यक खर्च टाळावा. तुमचे मनोबल वाढीस लागेल.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
परिवारातील प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कामाची दिवसभर धांदल राहील. कामाचा ताण नियोजनाने कमी करावा. आपलाच हेका खरा कराल.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. शक्यतो हलका आहार घ्यावा. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत घालवाल. प्रकाश झोतात याल.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
मित्रमंडळींचे सहकार्य घ्यावे लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. संयम ढळू देऊ नका. कौटुंबिक समस्येतून मार्ग निघेल. विशाल दृष्टीकोन बाळगावा.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
नातेवाईकांची मागणी पुरवाल. जोडीदाराचा खोटेपणा नाराजी वाढवू शकतो. आकांततांडव करू नका. स्पर्धेत यश मिळवाल. उत्पन्नाच्या नवीन संधी शोधाल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
आर्थिक प्रश्न सोडवाल. काही प्रश्न गोडीने सोडवावेत. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. बोलण्यावर ताबा ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्या.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
आज कामातून चांगला लाभ होईल. वादाच्या मुद्यातून मार्ग काढाल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. भौतिक सुखात वाढ होईल.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
व्यवसायातून चांगला लाभ होईल. लहानांशी मतभेदाची शक्यता. घराबाहेर वावरतांना सावध रहा. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
मनाचा तोल सांभाळावा. योग्य संधीचा लाभ घ्यावा लागेल. उगाच बंधनात अडकू नका. वैचारिक धोरण बदलून पहावे. दिवस काहीसा धावपळीत जाईल.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
शक्यतो सौम्य प्रतिक्रिया द्या. वैवाहिक सौख्याला जास्त प्राधान्य द्या. व्यवसाय वाढीचा आनंद घ्याल. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. क्षुल्लक कुरबुरींकडे दुर्लक्ष करा.
