Today Horoscope 1 May 2026 in Marathi: बुद्ध पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी विशेषतः गौतम बुद्धांची पूजा केली जाते. यंदा १ मे २०२६, शुक्रवार या दिवशी देशभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. या दिवसाला ज्योतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे, कारण अनेक शुभ योग तयार होत आहेत आणि काही ग्रहांच्या हालचालीतही बदल दिसणार आहे. चला तर मग, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या चंद्र गोचराची वेळ आणि त्याचा परिणाम जाणून घेऊया.

बुद्ध पौर्णिमेला चंद्र गोचर कोणत्या वेळी झाला?

पंचांगानुसार, १ मे २०२६ रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ग्रह स्वाती नक्षत्रात गेला आहे. हा गोचर पहाटे २ वाजून १६ मिनिटांनी झाला आहे. आता २ मे २०२६ रोजी सकाळी ४ वाजून ३५ मिनिटांपर्यंत चंद्र स्वाती नक्षत्रातच राहणार आहे. याआधी चंद्र चित्रा नक्षत्रात होता.

सिंह राशी (Today Horoscope Leo)

जीवनात सकारात्मक बदल होतील त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. आरोग्याकडे जास्त लक्ष द्याल आणि काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. घरातील वातावरणातही चांगला बदल दिसेल.

तूळ राशी (Today Horoscope Libra)

गेल्या काही दिवसांपासून ऑफिसमध्ये चाललेल्या अडचणी कमी होतील. तुमच्या बोलण्याला महत्त्व मिळेल आणि पद वाढू शकते. पैशांची सोय होऊन कर्ज फेडता येईल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन कराल.

वृश्चिक राशी (Today Horoscope Scorpio)

पैसा कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. जर अजून लग्न ठरले नसेल, तर तुमच्या मनासारखा जोडीदार मिळू शकतो. आरोग्यही बहुतेक वेळ चांगले राहील.

कुंभ राशी (Today Horoscope Aquarius)

ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे ते आपल्या जोडीदार आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील. कर्ज फेडण्यात यश मिळेल. तसेच प्रवासासाठी हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)