may 2026 horoscope : मे २०२६ चा पाचवा महिना आज सुरू झाला आहे. मे महिन्यात अनेक महत्त्वाचे सण आणि ग्रहांचे गोचर होणार आहेत. या महिन्याची सुरुवात पौर्णिमेच्या उपवासाने होईल आणि शेवटही पौर्णिमेनेच होईल. या महिन्यात बुद्ध पौर्णिमा, अपरा एकादशी, अमावस्या, वट सावित्री, शनि जयंती, पद्मिनी एकादशी यांसारखे सण असणार आहेत. या महिन्यात अनेक प्रमुख ग्रहांचे गोचर होऊन त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होताना दिसणार आहे.

मेष

तुमच्यासाठी हा महिना सकारात्मक बदल घेऊन येईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामे अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी हळूहळू प्रगती होईल, तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणेची चिन्हे दिसत आहेत आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. फक्त आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका, विशेषतः औषधे वेळेवर घ्या, रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा त्यामुळे नातेसंबंधांमधील तणाव वाढू शकतो.

वृषभ

हा महिना तुमच्यासाठी उत्पन्न आणि करिअरच्या बाबतीत फायदेशीर ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांनाही यश मिळण्याची शक्यता आहे, विशेषतः ऑनलाइन कामात. त्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रणात ठेवा, अन्यथा तुमचे बजेट बिघडू शकते. कुटुंबातील किरकोळ वाद टाळा.

मिथुन

तुमच्यासाठी हा महिना नवीन संधी घेऊन येईल. कौशल्ये आणि ज्ञान वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे भविष्यात मोठे फायदे मिळू शकतात. तुमचे करिअर स्थिर राहील आणि नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्या आणि अनावश्यक मित्रांसोबत वेळ वाया घालवणे टाळा.

कर्क

हा महिना तुमच्या करिअरमध्ये प्रगती घेऊन येईल, मेहनतीचे फळ मिळेल, आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडूनही पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. फक्त नकारात्मक विचार टाळा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या.

सिंह

तुमच्यासाठी हा महिना आर्थिक लाभ आणि यश घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. प्रलंबित रक्कम मिळण्याची शक्यता आहे. फक्त आळस झटकून टाका आणि रागाच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा.

कन्या

तुमच्यासाठी हा महिना शुभ असेल. तुमचे करिअर स्थिर होईल, प्रयत्न यशस्वी होतील. गुंतवणूक करण्यासाठी किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय घेण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. त्यामुळे घाईने निर्णय घेणे टाळा आणि कठोर शब्द वापरणे टाळा.

तूळ

हा महिना आदर आणि सन्मान घेऊन येईल. कुटुंबात प्रेम, आनंद टिकून राहील. विद्यार्थ्यांसाठी, भविष्यातील यशाचे नियोजन करण्याची ही वेळ आहे.

वृश्चिक

तुमच्यासाठी हा महिना यश आणि कर्तृत्वाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान मजबूत होईल, शत्रूंवर मात कराल, मालमत्तेसंबंधी कामातही यश मिळू शकते.

धनु

तुमच्यासाठी हा महिना शुभ चिन्हे घेऊन येत आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, धार्मिक कार्यांमधील तुमची आवड आणि मान सन्मानही वाढेल.
फक्त आरोग्याची काळजी घ्या आणि लांबचा प्रवास टाळा.

मकर

हा म्हणा काळजीपूर्वक काम करण्याचा आहे. कठोर परिश्रमाचे फळ नक्कीच मिळेल. पण, घाई करणे हानिकारक ठरू शकते. फक्त करिअरवर लक्ष केंद्रित करा. आपल्या आरोग्याची, आहाराची विशेष काळजी घ्या आणि मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या.

कुंभ

उत्पन्न वाढवण्याची, कौशल्ये सुधारण्याची हीच वेळ आहे. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील, तुमचा आत्मविश्वास वाढेल. फक्त खर्चावर नियंत्रण ठेवा.

मीन

तुमच्या करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी मिळतील. तुम्हाला कौटुंबिक पाठिंबा मिळेल आणि मानसिक ताण कमी होईल. फक्त आहाराकडे लक्ष द्या आणि नकारात्मक विचार टाळा.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)