October 2026 Horoscope : २०२६ मधील ऑक्टोबर महिना अंकशास्त्राच्या दृष्टीने विशेष ठरणार आहे. २०२६ या वर्षाच्या संख्येची बेरीज १ येते आणि ऑक्टोबर महिन्याचाही बेरीज १ येते. त्याचबरोबर १ हा अंक सूर्याशी संबंधित मानला जात असल्यामुळे, या महिन्यात सूर्याचा प्रभाव अधिक जाणवू शकतो, असे अंकशास्त्रात मानले जाते. यामुळे आत्मविश्वास, धैर्य आणि शक्ती वाढू शकते. एका नवीन सुरुवातीसाठी प्रेरणा मिळू शकते. हा महिना तुमच्यासाठी अनेक नवीन संधी घेऊन येऊ शकतो. तुम्ही जुन्या गोष्टींना निरोप देऊन एक नवीन सुरुवात करू शकता. तुम्ही आयुष्यासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय देखील घेऊ शकता. तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची तुमची इच्छाशक्ती वाढू शकते. तर याच पाश्वभूमीवर तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा महिना कसा जाणार जाणून घेऊया.

मूलांक १

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक १ असतो. तुम्ही या महिन्यात अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळवू शकता. तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. तुम्हाला तुमची क्षमता ओळखता येऊ शकते, ज्याचा उपयोग तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी करू शकता. त्याचबरोबर तुमच्यासाठी यशाचे अनेक नवीन मार्ग खुले होऊ शकतात.

मूलांक २

कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ या तारखांना तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा मूलांक २ असतो. तुमच्यासाठी ऑक्टोबर महिना महत्त्वपूर्ण ठरू शकतो. कुटुंबातील चालू असलेले वाद किंवा भांडणे मिटू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. नातेसंबंधात गोडवा वाढू शकतो. तुम्ही नवीन लोकांशी जोडले जाऊ शकता. तुमच्या करिअर आणि व्यवसायाला महत्त्वपूर्ण वळण येऊ शकते. तर व्यवसायात गुंतलेल्यांनाही या महिन्यात फायदा होऊ शकतो.

मूलांक ३

तुमचा जन्म ३, १३, २१ किंवा ३० या तारखांना झाला असेल तर तुमचा मूलांक ३ आहे. तुमच्यासाठी हा महिना खूप प्रभावी ठरणार आहे. या महिन्यात, तुम्ही तुमची क्षमता दाखवण्यात यशस्वी होऊ शकता. तुमचे संवाद कौशल्य आणि भाषण प्रभावी ठरू शकते. परिणामी, तुम्ही तुमच्या शब्दांनी लोकांना प्रेरणा देऊ शकता. समाजात तुमचा आदर वाढू शकतो. तुम्हाला व्यवसायात नफाही मिळू शकतो. त्याचबरोबर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

मूलांक ४

तुमचा जन्म ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक ४ असतो. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळू शकते. जे नोकरी करत आहेत, त्यांच्या कामाचे कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकते. यामुळे पदोन्नती आणि मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमची आर्थिक परिस्थितीही हळूहळू सुधारू शकते. गणपतीच्या आशीर्वादाने, रखडलेले प्रकल्प पूर्ण होऊ शकतात.

मूलांक ५

तुमची जन्मतारीख ५, १४ किंवा २३ असेल तर तुमचा मूलांक ५ असतो. तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात व्यवसायात लक्षणीय फायदा होऊ शकतो. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करून त्याचा विस्तार करू शकता. आयात-निर्यात व्यापारातूनही मोठा नफा मिळू शकतो. तुम्हाला नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळू शकते. तुमचा सामाजिक दर्जा वाढू शकतो. तुम्ही काही महत्त्वाच्या लोकांना भेटू शकता. यामुळे तुम्हाला चांगली बातमी किंवा नवीन संधी मिळू शकतात.

मूलांक ६

तुमचा वाढदिवस ६, १५ आणि २४ तारखेला येत असेल तर तुमचा मूलांक ६ आहे. हा महिना तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. या काळात तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठांकडून पाठिंबा देखील मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडूनही पूर्ण पाठिंबा मिळू शकतो, ज्यामुळे तुम्हाला तुमची ध्येये साध्य करण्यास मदत होईल. या महिन्यात तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. मीडिया, लक्झरी, रिअल इस्टेट आणि सरकारी प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना या महिन्यात महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी देखील मिळू शकते.

मूलांक ७

तुमचा वाढदिवस कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला येत असेल तर तुमचा मूलांक ७ आहे. नवीन आणि महत्त्वाच्या कल्पना सुचवण्यास मदत करणारा हा महिना ठरेल. तुम्ही भविष्यासंबंधी अनेक निर्णय घेऊ शकता. तुमच्या बौद्धिक क्षमतांमध्येही वाढ होईल, तुम्ही इतरांसाठी प्रेरणास्थान ठराल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा महिना चांगला असू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या सर्जनशीलतेद्वारे अनेक प्रकल्पांमध्ये यश मिळवू शकतात. तुमचा दर्जा आणि प्रतिष्ठा देखील वाढू शकते.

मूलांक ८

तुमची जन्म ८, १७ किंवा २६ तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक ८ आहे. तुम्ही ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. तुमचा कल अध्यात्माकडे असू शकतो. तुम्ही अनेक यात्रा करू शकता. तुम्हाला भौतिक सुखसोयी मिळू शकतात. लोक तुमच्या शब्दांचे कौतुक करू शकतात. तुम्ही आत्मपरीक्षण करू शकता.

मूलांक ९

९, १८ किंवा २७ तारखेला वाढदिवस असणाऱ्यांचा मूलांक ९ असतो. त्यामुळे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात फायदा होऊ शकतो. पण, घाईत निर्णय घेणे टाळा. शिवाय, कोणतीही घाईची पावले उचलणे टाळा. तुम्ही या महिन्यात एक नवीन उपक्रम सुरू करू शकता. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत अनेक नवीन संधी मिळू शकतात आणि पदोन्नतीची शक्यता देखील आहे. कठोर परिश्रमाने तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळवू शकता.