Navpancham Rajyog 2026 : पंचांगानुसार, आज ३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी गुरू आणि बुध एकमेकांपासून १२० अंशांवर असतील, ज्यामुळे नव पंचम राजयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह पाचव्या (५व्या) आणि नवव्या (९व्या) घरात एकमेकांच्या संबंधात येतात. तेव्हा नव पंचम राजयोग तयार होतो.

तसेच १० एप्रिल रोजी, गुरु सायंकाळी बुधाबरोबर युती करून शक्तिशाली नवपंचम राजयोग तयार करणार आहे. त्यामुळे हा राजयोग सर्व १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करणारा ठरणार आहे. गुरू आणि बुध यांच्या कोनीय स्थितीमुळे तयार झालेल्या नव पंचम राजयोगाचा कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो याबद्दल बातमीतून जाणून घेऊयात…

तसेच १० एप्रिल रोजी, गुरु सायंकाळी बुधाबरोबर युती करून शक्तिशाली नवपंचम राजयोग तयार करणार आहे. त्यामुळे हा राजयोग सर्व १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करणारा ठरणार आहे. गुरू आणि बुध यांच्या कोनीय स्थितीमुळे तयार झालेल्या नव पंचम राजयोगाचा कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो याबद्दल बातमीतून जाणून घेऊयात…

कर्क

तुमच्या कुंडलीत गुरु १२ व्या आणि बुध ८ व्या घरात असणार आहे, त्यामुळे तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये लाभ, जीवनात आनंद आणि सुख येऊ शकते. ज्यांचा कल अध्यात्माकडे असेल, ते धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतात. या काळात भौतिक सुखसोयी प्राप्त होतील, विद्यार्थ्यांना फायदा, घरात शांती आणि आनंद नांदू शकणार आहे. त्यामुळे नोकरी करणारे लोक कामासाठी प्रवास करू शकतात, ज्यामुळे भविष्यात लाभ मिळू शकतो.

तूळ

तुमच्या राशीच्या कुंडलीच्या गुरु ९ व्या घरात आणि बुध ५ व्या घरात असल्यामुळे नवपंचम राजयोग अनुकूल ठरेल. प्रत्येक क्षेत्रात भाग्याची साथ, बऱ्याच काळापासून थांबलेली कामे पुन्हा सुरू होणार. तसेच नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला काळ राहील, कामात, नवीन प्रकल्पात यश मिळेल. ग्राहक खूश होऊ शकतात. तुमच्या कामामुळे तुम्हाला बढती, आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्हाला उत्साही वाटेल.

मीन

गुरु आणि बुध यांच्या युतीने तयार झालेला नवपंचम राजयोग मीन राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. गुरु चौथ्या घरात आणि बुध बाराव्या घरात असल्याने, पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. हा काळ नोकरदार व्यक्तींना यश, सन्मान मिळवून देईल. या काळात विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करू शकतात.

कुंभ

तुमच्या राशीच्या कुंडलीच्या लग्न घरात बुध आणि पंचम घरात गुरु असेल. अशा परिस्थितीत, दोघांच्याही कोनीय स्थानांवर तयार झालेला नवपंचम राजयोग तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये लाभ मिळवून देईल. निर्णयक्षमता झपाट्याने वाढेल, अनेक योजना यशस्वी होतील. उत्पन्न चांगले राहण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर या काळात तुम्हाला लाभ मिळू शकतो. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळू शकते.

धनु

नवपंचम राजयोग तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो. गुरु या राशीच्या सप्तम स्थानात आणि बुध तृतीय स्थानात मार्गी आहे. या काळात, वैवाहिक जीवनातील सध्याच्या समस्या आणि तणाव दूर होण्याची शक्यता दिसते आहे. अविवाहित व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. गुरुची लग्नस्थानावर सप्तम दृष्टी असल्यामुळे, करिअरमध्ये प्रगती, उत्पन्न वाढ आणि पदोन्नतीच्या शक्यतेचा लाभ देखील मिळू शकतो. त्याचबरोबर व्यवसायाच्या क्षेत्रातही नफा मिळण्याची शक्यता आहे.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)