Daily Horoscope 10 August 2026 In Marathi : आज १० ऑगस्ट २०२६ रोजी शुक्ल पक्षातील जेष्ठ महिन्यातील द्वादशी तिथी सकाळी ८ वाजून १ मिनिटांपर्यंत असणार आहे. रात्री २ वाजून ५ मिनिटांपर्यंत वज्र व सिद्धी योग जुळून येईल आणि दुपारी १२ वाजून २७ मिनिटांपर्यंत आर्द्रा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ७ वाजून ५५ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अभिजात मुहूर्त सकाळी १२ वाजून १८ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ९ मिनिटांपर्यंत असणार आहे. आठवड्याची सुरुवात तुमच्या राशीसाठी कशी असणार चला जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, १० ऑगस्ट २०२६ (Horoscope Today 10 August 2026 In Marathi)
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
घरगुती प्रश्न मिटतील. साधनेला चांगला काळ आहे. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करावे. स्वत:वर ताबा ठेवावा. दिवस खेळीमेळीत जाईल.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
कामे जलद गतीने उरकण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावा. चांगल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. व्यापारी वर्गाला दिवस लाभदायक असेल. खादी चांगली बातमी मिळेल.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
तरुण मंडळींनी फार उतावीळपणा करू नये. बदल स्वीकारावा लागेल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. वाहन विषयक अडचण मिटेल. हातात काही अधिकार येतील.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
पारदर्शी व्यवहार करावेत. भावंडांना सहाय्य करावे लागेल. आज एखादी आठवण जागृत होईल. विरोधक नामोहरम होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
अतिविचार करू नका. नवे मनसुबे यश देतील. बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मित्रांची उत्तम साथ लाभेल.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
कलाकार मंडळींना वेगळा दर्जा मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. झोपेची तक्रार जाणवेल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. घराबाहेर सावधानतेने वावरावे.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
महिला वर्ग खुश राहील. मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल. टीमवर्क उपयोगाला येईल. नवीन विचार जाणून घेता येतील. शुभ वार्ता मिळतील.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
कामात अधिक उत्साह वाटेल. कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल. दिवसाची सुरुवात व्यस्त राहील. लाभाच्या अनेक संधी चालून येतील. मनातील चिंता दूर होईल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
खाण्या-पिण्याचे पथ्ये पाळावीत. निर्णय उत्स्फूर्तपणे घेतले तर फळाला येतील. ज्येष्ठांशी सुसंवाद साधावा. सहकार्यांशी वाद घालू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
जुने व्यवहार लाभ देतील. काळाची पाऊले ओळखावीत. घरगुती वादविवादात अडकू नका. कामातील प्राधान्य जाणून घ्यावे. धार्मिक कामात मन रमवाल.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
जोडीदाराची प्रगती होईल. चर्चेतून नवकल्पना सुचतील. करमणूक प्रधान गोष्टी कराल. भेटवस्तू देताना खर्चाचा विचार कराल. सहकार्यांना सोबत कराल.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
उत्साहाने कार्यरत राहाल. दिवसाची सुरुवात धीम्यागतीने होईल. समस्यांचे निराकरण होईल. कौटुंबिक वादात पडू नका. स्वभावात उधळेपणा येईल.
