10 May Grahan Yog: मे महिन्यात १० तारखेला चंद्र मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राचा हा गोचर दुपारी १२ वाजून १३ मिनिटांनी होईल. कुंभ राशीत राहू आधीपासूनच विराजमान असल्यामुळे राहू आणि चंद्र यांची युती होऊन ग्रहण योग तयार होणार आहे.
ज्योतिषशास्त्रात हा योग अशुभ मानला जातो. या योगामुळे काही राशींच्या लोकांना जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशींवर याचा प्रभाव पडू शकतो आणि कोणते उपाय केल्याने ग्रहण योगाचा वाईट परिणाम टाळता येऊ शकतो.
मेष राशी (Aries Horoscope)
ग्रहण योग तुमच्या लाभ भावात तयार होणार असल्यामुळे लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. परदेशी व्यवसाय किंवा विदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांनी प्रत्येक काम विचारपूर्वक करणे गरजेचे आहे, कारण छोटी चूकही मोठे नुकसान करू शकते.
कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत वाद टाळा, नाहीतर तुमच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होऊ शकतो. या राशीतील काही लोकांना मानसिक आणि शारीरिक त्रास जाणवू शकतो. उपाय म्हणून पांढऱ्या वस्तू जसे तांदूळ, साखर, दूध, दही, पांढरे कपडे यांचे दान करावे.
कन्या राशी (Virgo Horoscope)
तुमच्या राशीपासून सहाव्या भावात ग्रहण योग तयार होणार आहे. त्यामुळे तुमचे विरोधक सक्रिय होऊ शकतात आणि तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. काही लोकांच्या जीवनात आर्थिक अडचणी येऊ शकतात आणि नको असतानाही साठवलेले पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे योग्य बजेट बनवून चालणे गरजेचे आहे. कौटुंबिक जीवनातही तणाव निर्माण होऊ शकतो. उपाय म्हणून कन्या राशीच्या लोकांनी भगवान शिवाची पूजा करावी.
मीन राशी (Pisces Horoscope)
राशिचक्रातील शेवटची राशी असलेल्या मीन राशीच्या लोकांना करिअर आणि शिक्षण क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही कामे अडकू शकतात, त्यामुळे संयम ठेवून पुढे जाणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात आणि त्यामुळे त्रास वाढू शकतो. ग्रहण योगाच्या काळात कोणावरही जास्त विश्वास ठेवणे टाळावे, कारण फसवणूक होण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबतही मीन राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उपाय म्हणून शिवलिंगावर जल अर्पण करावे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
