scorecardresearch

अक्षय्य तृतीयेला शेकडो वर्षांनी जुळले सात राजयोग! ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून अधिक चमकणार, धनलाभाचे योग

Akshay Tritiya 2023 Shubh Yog: अक्षय्य तृतीया हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मियांचा हा पवित्र सोहळा यंदा….

100 years Later akshaya tritiya 2023 Has Seven Shubh Raj Yog These Three Zodiac Signs To Get Huge Money Astrology Today
अक्षय्य तृतीयेला शेकडो वर्षांनी जुळून आले सात राजयोग (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Akshay Tritiya 2023 Shubh Yog: हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. असे म्हणतात की या दिवशी कुठल्याही नव्या कामाचा आरंभ केल्यास त्याचे परिणाम हे अक्षय्य म्हणजेच कधीही न संपणारे ठरतात. याच दिवशी पृथ्वीवर जीवनाची सुरुवात सुरुवात झाली अशीही मान्यता आहे. भगवान विष्णूने प्रथम अवतारही याच दिवशी घेतल्याची भक्तांची श्रद्धा आहे. या माहात्म्यामुळेच अक्षय्य तृतीया हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मियांचा हा पवित्र सोहळा यंदा २२ एप्रिल या दिवशी साजरा केला जाणार आहे. योगायोगाने शेकडो वर्षांनी अक्षय्य तृतीयेलाच तब्बल ७ शुभ योग्य जुळून आले आहेत.

अक्षय्य तृतीयेला शेकडो वर्षांनी जुळले सात राजयोग

२२ एप्रिलला गुरुदेव ग्रह हे मेष राशीत स्थिर होणार आहेत तर यादिवशी शनीचा वार आहे. चंद्रमा सुद्धा उच्च स्थानी असून वृषभ राशीत प्रभावी असणार आहेत. कृतिका नक्षत्रात याच दिवशी आयुष्यमान योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, अमृत सिद्धी योग, त्रिपुष्कर योग असे राजयोग सुद्धा तयार होत आहे. हिंदू पंचांगानुसार २२ एप्रिलला सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी अक्षय्य तृतीया तिथीचा आरंभ होईल तर २३ एप्रिल सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांपर्यंत शुभ कार्याचा योग कायम असणार आहे.

अक्षय्य तृतीयेला ‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

मेष (Aries Zodiac)

सूर्य व गुरु मूळ मेष राशीतच प्रथम भावात स्थिर असल्याने मेष राशीसाठी येणारे नववर्ष हे सुवर्णसंधींनी भरलेले असू शकते. या राजयोगासह आपल्या व्यवसायात वृद्धीचे संकेत आहेत. आपल्याला शारीरिक व मानसिक ऊर्जा जाणवेल. समाजातील मान- सन्मान वाढीस लागू शकतो. तसेच आपल्याला कामाच्या ठिकाणी सर्व ध्येय पूर्ण करता येऊ शकतात. याचा प्रभाव आपल्या वेतनावर व पदोन्नतीवर होऊ शकतो.

मकर (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या चतुर्थ स्थानी गुरु सूर्य युती तयार होत आहे. हे स्थान भौतिक सुख व सुविधांचे केंद्र मानले जाते. येत्या काळात आपल्या वाहन व भवन अशा दोन्ही गोष्टी प्राप्त करण्याची संधी लाभू शकते. तुमच्या आई वडिलांसह नाते घट्ट होऊ शकते.

हे ही वाचा<< ३० एप्रिलपर्यंत कोणत्या राशींना बक्कळ धनलाभ, कोणावर संकट? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

मीन (Pisces Zodiac)

मीन राशीच्या गोचर कुंडलीत दुसऱ्या स्थानी सूर्य व गुरुची युती तयार होत आहे. येत्या काळात आपल्याला वाणीवर काम करावे लागेल पण यातूनच तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याचे सुद्धा योग आहेत. तुम्हाला नव्या नोकरीची संधी मिळू शकते पण यावेळी अत्यंत हुशारीने काम करावे लागेल. प्रलंबित कामातून आपल्या प्रगतीची चिन्हे आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 15:02 IST

संबंधित बातम्या