Dainik Rashi Bhavishya in Marathi, 11 June 2025 : ११ जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. पौर्णिमा तिथी दुपारी १ वाजून १४ मिनिटांपर्यंत राहील. दुपारी २ वाजून ४ मिनिटांपर्यंत साध्य योग जुळून येईल. संध्याकाळी ८ वाजून ११ मिनिटांपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र जागृत असेल. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १:३० वाजेपर्यंत असणार आहे. साध्य योगात कोणत्या राशीवर बसणार पैशांचा पाऊस जाणून घेऊया…

११ जून २०२५ पंचांग व राशिभविष्य ( Horoscope Today in Marathi, 11 June 2025)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

जवळच्या मित्रांशी वितुष्ट येऊ शकते. जमिनीच्या कामातून चांगला मोबदला मिळेल. काही कामे तुमचा कस पाहतील. व्यावसायिक लाभातून समाधान मिळेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

सामाजिक प्रतिष्ठेचा विचार कराल. सहकार्‍यांची मदत घ्यावी लागेल. काही तांत्रिक बदल करावे लागतील. आर्थिक कामे वेळेत पार पडतील. वडीलांशी खटके उडू शकतात.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

आर्थिक कामात फसवणुकीपासून सावध राहावे. थोरांच्या सल्ल्याची गरज भासेल. इतरांना स्वत:चे महत्त्व पट‍वून द्याल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे अधिक लक्ष राहील.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

मनातील चिंतेला आवर घाला. कामात अधिकार्‍यांचा सल्ला मिळेल. कागदपत्रांची योग्य जुळवणी करावी लागेल. मनात काही गैरसमज उत्पन्न होऊ शकतात. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

विसंवादाचे कारण उकरून काढू नका. मुलांवरील खर्च वाढू शकतो. भागीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. अडकून पडलेले काम मार्गी लागेल. प्रेम वीरांनी नसते साहस करू नये.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

कामे मन लावून करणे गरजेचे आहे. व्यावसायिक स्पर्धेत सावधान रहा. धार्मिक कार्याचा आनंद घ्याल. भावंडांचा विरोध होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक फायद्यावर लक्ष केन्द्रित राहील.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

मुलांबाबत चिंता निर्माण होईल. आजचा दिवस कष्टात जाईल. स्वातंत्र्यप्रिय विचार कराल. कौटुंबिक सौख्याकडे दुर्लक्ष करू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

प्रेमप्रकरणाला कलाटणी लागू शकते. उगाच राईचा पर्वत केला जाईल असे होऊ देवू नका. कामाव्यतिरिक्त इतर भानगडी निस्तराव्या लागतील. वेळेचा अपव्यय टाळावा. वैवाहिक जीवनात ताणतणाव राहील.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

महत्वाकांक्षेच्या जोरावर कामे हाती घ्याल. छोट्याश्या अपयशाने खचून जाऊ नका. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागा. जोडीदाराशी मनमोकळा वार्तालाप करावा.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

बिनधास्तपणे वागून चालणार नाही. जोडीदाराशी वाद वाढू शकतो. वयोवृद्धानी आरोग्याची काळजी घ्यावी. नवीन कामात अधिक कष्ट पडतील. लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. अती हटवादीपणा चालणार नाही. महत्वाकांक्षेला योग्य वळण द्यावे. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे. तांत्रिक बाजूंचा नीट अभ्यास करावा. स्थावर संबंधीचे प्रश्न उद्भवू शकतात. हातातील अधिकाराची जाणीव ठेवा. कोर्टाची कामे निघू शकतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर