11th June Daily Rashi Bhavishya Marathi Horoscope: ११ जून २०२४ ला पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पंचमी तिथी असणार आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत पंचमी तिथी कायम असेल. ११ जून ला संध्याकाळी ४ वाजून २८ मिनिटांपर्यंत व्याघात योग असणार आहे तर मंगळवारी रात्री ११ वाजून ४१ मिनिटापर्यंत आश्लेषा नक्षत्र जागृत असणार आहे. ११ जून हा दिवस श्रुती पंचमी म्हणून साजरा केला जाईल. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या नशिबात काय लिहिलंय हे पाहूया.. ११ जून २०२४ पंचांग व १२ राशींचे भविष्य मेष:-आवडीचे पदार्थ खायला मिळतील. तुमच्या कामात हळूहळू सुधारणा करता येईल. संपर्कातील लोकांचे सहकार्य मिळेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. जोडीदाराची निवड ग्राह्य मानावी लागेल. वृषभ:-तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक कामाचा ताण वाढेल. कामे आपल्या मर्जीनुसार करण्यावर भर द्याल. समोरील प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. मनाची द्विधावस्था टाळावी. मिथुन:-मित्रत्वाची भावना जोपासाल. मानसिक ताण हलका करण्याचा प्रयत्न करावा लागेल. निराशाजनक विचार मनातून काढून टाकावेत. धार्मिक कामात मन गुंतवावे. व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवावे. कर्क:-कामातील सक्रियता वाढवावी लागेल. गरज भासल्यास अधिकार्यांचा सल्ला विचारात घ्यावा. मानसिक चंचलता जाणवेल. मनातील संकोच दूर सारावा. जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका. सिंह:-स्वमुल्यावर कामे करत राहाल. व्यावसायिक लाभाबाबत सतर्क राहावे. आत्मविश्वासाने परिपूर्ण वृत्ती अंगीकारू शकाल. आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष नको. पाठदुखी सारखे त्रास जाणवू शकतात. कन्या:-इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. जोडीदाराची समजूत काढावी लागेल. मदतीचा हात सदैव पुढे कराल. तुमचा दृष्टीकोन बदलून पहा. भागीदारीत अधिक लक्ष घाला. तूळ:-योग्य पथ्ये पाळावीत. पोटदुखी सारखे त्रास जाणवू शकतात. काही कामे जलद गतीने मार्गी लागतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. अधिकार्यांच्या विरोधात कामे करू नका. वृश्चिक:-कोणत्याही वाटाघाटी करताना सावध राहावे. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. भागीदारीत विशेष लक्ष घालावे. वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल. धनू:-आर्थिक चढ-उतार लक्षात घ्यावेत. नवीन धाडस करताना सारासार विचार करावा. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. अनाठायी खर्च वाढू शकतो. मकर:-कामाच्या ठिकाणी आळस करू नका. इतरांच्या सल्ल्याने वागताना विचार करावा. एकमेकांचे सुख-दू:ख नीट जाणून घ्या. नातेवाईकांची मनधरणी करावी लागू शकते. भिन्नलिंगी व्यक्तिला आकर्षित करू शकाल. कुंभ:-बोलताना भान राखावे लागेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरातील गोष्टींबाबत फार दक्ष राहाल. मनातील आतुरता वाढीस लागेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. हे ही वाचा<< गुरु झाले स्वामी, धनलाभाची संधी नामी! शनी जयंतीनंतर ५८ दिवस प्रचंड श्रीमंती व आनंद मिळवतील ‘या’ ३ राशी, वाटा लाडू पेढे मीन:-स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. कामे अधिक जोमाने कराल. काही स्वतंत्र मते मांडाल. संपूर्ण विचारांती कृती करावी. भावंडांचे सहकार्य मिळेल. - ज्योतिषी विद्याधर करंदीकर