Daily Horoscope 11 May 2026 In Marathi : उद्या ११ मे २०२६ रोजी वैशाख कृष्ण पक्षातील नवमी तिथी दुपारी ३ वाजून १८ मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर दशमी तिथी सुरु होईल. आज इंद्र योग जुळून येईल आणि शतभिषा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५१ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १० वाजता सुरु होईल ते १२ वाजून १७ पर्यंत असणार आहे. तुमच्या राशीची आठवड्याची सुरुवात कशी होणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, ११ मे २०२६ (Horoscope Today 11 May 2026 In Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे लागेल. श्रमातून कार्यसिद्धी होईल. मौल्यवान वस्तूंकडे आकर्षण वाढेल. काही बदलांना सामोरे जावे लागू शकते.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
सामाजिक कामात सावधगिरी बाळगावी. सहकार्यांशी जुळवून घ्यावे लागेल. कामात कसलीही हयगय करू नका. नोकरदारांना कामाचा ताण जाणवू शकतो. विलंबावर मात करावी लागेल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
प्रवासात अत्यंत सावधानता बाळगावी. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. निराशेच्या आहारी जाऊ नका. काही गोष्टी क्षणिक आनंद देऊन जातील. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
कामाची योग्य पोचपावती मिळेल. उष्णतेचे विकार जाणवतील. मुलांची चिंता लागून राहील. शारीरिक कष्ट वाढू शकतात. कामातील निराशाजनक स्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
कचेरीची कामे लांबणीवर पडू शकतात. व्यावसायिक अडचणी जाणून घ्याव्यात. जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. अनपेक्षित गोष्टींचा फार विचार करू नका. भागीदाराच्या मताचा आदर करावा.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
कामाची फार चिंता करू नका. चोरांपासून सावध राहावे. जुगाराच्या मार्गाचा वापर करू नका. प्रेमप्रकरणातील कटुता टाळावी. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ऐनवेळेची धावपळ टाळण्याचा प्रयत्न करावा. चैनीकडे अधिक कल राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. शेअर्स मधून धनलाभाची शक्यता. घरगुती प्रश्न शांतपणे हाताळा. जोडीदाराच्या स्वभावाचा अचंबा वाटेल. मुलांची स्वतंत्र वृत्ती लक्षात घ्यावी.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. योग्य कार्यपद्धत वापराल. एकंदरीत कामाचा उरक वाढला जाईल. काही वेळेस नमते घ्यावे लागेल. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
मुलांच्या धडाडीचे कौतुक कराल. बौद्धिक दृष्टीकोनाची चुणूक दाखवाल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. जबाबदारी आनंदाने पार पाडाल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
क्रोधावर नियंत्रण ठेवा. मन:शांती जपणे महत्त्वाचे आहे. घरगुती गोष्टींनादेखील प्राधान्याने विचारात घ्यावे. जवळच्या प्रवासाचा योग येईल. अती धाडस करू नका.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
मदतीशिवाय कामे उरकती घ्याल. कर्तृत्वाने स्वत:चे महत्त्व पटवून द्याल. कौटुंबिक वातावरणात दिवस मजेत घालवाल. सारासार विचार करण्यात भर द्याल. नातेवाईकांना `भेटण्याचा योग येईल.
