11 May Horoscope Mangal Gochar: ग्रहांचे सेनापती मंगळ ११ मे रोजी केतूच्या अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्रात मंगळाचं आगमन ४ राशींसाठी वरदानासारखं ठरू शकतं. ज्योतिषशास्त्रानुसार, या गोचरामुळे या राशींचं नशीब चमकू शकतं. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये यश मिळू शकतं. धन-संपत्तीत वाढ होईल. जमीन-जुमल्याचं सुख मिळू शकतं. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
मेष राशी (Aries Zodiac Sign)
मंगळाचं नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतं. या राशीच्या लोकांची बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील.
अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याचे योग आहेत. जोडीदाराच्या सहकार्यामुळे करिअरमध्ये मोठं यश मिळू शकतं.
मिथुन राशी (Gemini Zodiac Sign)
मंगळाचं नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतं. कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मोठी डील फायनल होऊ शकते. संपत्तीशी संबंधित प्रकरणांमध्ये विजय मिळू शकतो. अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. जुन्या कर्जातून मुक्ती मिळू शकते.
सिंह राशी (Leo Zodiac Sign)
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर खूप फायदेशीर ठरू शकतं. तुमच्या धाडसात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यवसायात नफा मिळेल. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.
धनु राशी (Sagittarius Zodiac Sign)
धनु राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामातून भरपूर पैसा मिळू शकतो. अचानक मोठा धनलाभ होण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित एखादा वाद मिटण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळण्याचे योग आहेत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
