11th August 2024 Panchang And Rashibhavishya : आज ११ ऑगस्ट २०२४ रोजी (रविवार) श्रावणातील पहिला आठवडा पूर्ण होत आहे. आज श्रावण शुल्क पक्षातील सप्तमी तिथी आहे, सप्तमी तिथी रविवार पूर्ण दिवस आणि रात्री तसेच सोमवारी सकाळी ७ वाजून ५६ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर दुपारी ३वाजून ४९ मिनिटांपर्यंत शुभ योग राहील.तसेच रविवारी संपूर्ण दिवस आणि रात्र पार केल्यानंतर सोमवारी सकाळी ८.३३ पर्यंत स्वाती नक्षत्र राहील. तर आजचा राहू काळ पहाटे ०५ वाजून ३२ मिनिटांनी सुरु होईल ते सकाळी ०७ वाजून ०८ मिनिटांपर्यंत असणार आहे. ११ ऑगस्ट रोजी रात्री ११.०८ वाजता पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राचे संक्रमण होईल. यादिवशी अभिजित मुहूर्त दुपारी १२ वाजून ०७ मिनिटांपासून सुरु होईल ते दुपारी १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज मेष ते मीन राशींपैकी कुणाच्या नशिबात लाभ आहे आणि कुणाला काळजी करण्याची गरज ते आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊया… ११ ऑगस्ट पंचांग व राशी भविष्य (11th August 2024 Rashibhavishya) मेष:- योग्य मान मिळेल. आपले डोके शांत ठेवावे. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कार्यक्षेत्रात नवीन आव्हान सामोरी येऊ शकतात. समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण कराल. वृषभ:- जुनी येणी वसूल होतील. जुन्या ओळखीच्या लोकांच्या भेटी होतील. स्पर्धकांना नामोहरम करायला थोडे अधिक कष्ट पडतील. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. जोडीदाराच्या भावना समजून घ्याल. मिथुन:- घरातील कामे पूर्ण होतील. दिवस धावपळीचा जाईल. मुलांकडून सकारात्मक वार्ता मिळतील. तुमचे मनोबल वृद्धिंगत होईल. कुटुंबासोबत दिवस मजेत जाईल. कर्क:- घाईघाईने कामे करावी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल. आध्यात्मिक आवड वाढेल. व्यवसाय विस्ताराच्या विचारावर ठाम राहाल. जोडीदाराच्या यशाने आनंदी व्हाल. Read More News On Astrology : ४ सप्टेंबरपर्यंत ‘या’ तीन राशींना मिळणार नशिबाची साथ! राहू – बुधाच्या कृपेने प्रत्येक कामात यश अन् धनलाभाचे संकेत सिंह:- लोकांची प्रशंसा लाभेल. कामे जलद गतीने उरकावी लागतील. दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. सरकारी योजनांचा लाभ मिळवाल. कौटुंबिक खर्चावर आळा घालावा. कन्या:- दिवस आनंदात जाईल. घरातील थोरांचे आशीर्वाद घ्या. व्यापारी कौशल्य वापराल. पुढील सोयीसाठी गुंतवणूक कराल. ज्येष्ठांची सेवा करण्याची संधी मिळेल. तूळ:- कामाचा व्याप वाढेल. जुनी कामे मार्गी लावाल. संमिश्र घटनांचा दिवस. मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल. विनाकारण धावपळ वाढेल. वृश्चिक:- शांत डोक्याने विचार करावा. विचारपूर्वक कामे करावीत. आव्हान स्वीकारताना सावध राहावे. अथक मेहनत यश मिळवून देऊ शकेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. धनू:- मनातील इच्छा पूर्ण होईल. दिवसाचा बराच काळ धार्मिक कामात घालवाल. समाजात तुमचा मान वाढेल. धनसंचयात वाढ होईल. मित्रांची मदत फायदेशीर ठरेल. मकर:- आपले मत योग्य प्रकारे पटवून द्याल. दिवसभर कामाची धावपळ राहील. वडीलधार्यांना नाराज करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. अनावश्यक खर्च टाळावेत. कुंभ:- विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. भागीदाराच्या मताचा आदर करावा. तरच यशदायी परिणाम दिसतील. प्रलंबित येणी प्राप्त होतील. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत. मीन:- अति विचार करत बसू नका. नवीन ओळखीतून मैत्री वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत सापडतील. व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक असेल. जोडीदाराच्या साथीने समोरील प्रश्न सोडवाल. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर