Rashi Bhavishya 12 June 2026 In Marathi : उद्या १२ जून २०२६ रोजी अधिक मासातील जेष्ठ महिन्यातील द्वादशी तिथी असणार आहे. आज अश्विनी नक्षत्र जागृत असेल आणि अतिगंड योग जुळून येणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १० वाजून ३४ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून १७ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर मेष ते मीन राशींचा शुक्रवार कसा जाणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, १२ जून २०२६ ( Dainik Rashi Bhavishya 12 June 2026 In Marathi)
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
गैरसमजुतीतून त्रास संभवतो. डोळ्यांची तपासणी करावी लागेल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेमाच्या दृष्टीने मैत्रीत सुधारणा होईल. काही कौटुंबिक चिंता सतावतील. मनाजोगी खरेदी करता येईल. हौस भागवणे शक्य होईल.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
मानसिक आंदोलनाला आवर घालावी. मनातील विचित्र कल्पना काढून टाका. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. काही गोष्टीइच्छेविरूद्ध कराव्या लागतील. महत्त्वाची कामे आज टाळावीत.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
फार विचार करत बसू नका. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. डोळे झाकून कोणतेही कृत्य करू नका. फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक चंचलता जाणवेल.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
आर्थिक लाभावर लक्ष केन्द्रित करा. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. मिळालेल्या लाभाबाबत समाधानी रहा. इतरांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करा.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
विशाल दृष्टिकोन ठेवावा लागेल. कलेला पोषक वातावरण मिळेल. तुमच्यातील सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळेल. भौतिक सुखापासून दूर राहाल. पत्नीचे वर्चस्व जाणवेल.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
कमी श्रमातून चांगला लाभ होईल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. अपचनाचा त्रास जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा लाभ मिळेल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
नवीन कामात सावधानता बाळगा. कौटुंबिक कामात विशेष लक्ष घालावे लागेल. प्रणयराधनेत सक्रियता वाढेल. आर्थिक लाभापेक्षा कामाचा आनंद मिळवाल. भागिदारीतून मनाजोगा नफा मिळेल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
कष्टाला मागेपुढे पाहू नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराविषयी गैरसमज वाढू शकतात. हाताखालील नोकरांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
जवळच्या प्रवासात काळजी घ्या. भावंडांशी दुरावा वाढू शकतो. प्रेमसौख्याला अधिक बहार येईल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून खटके उडू शकतात. करमणुकीत अधिक वेळ घालवाल.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
बौद्धिक कामात सक्रिय राहाल. धार्मिक यात्रांचे आमंत्रण घेऊ नये. घरातील वातावरण प्रसन्न राहील. रेस-जुगारातून नुकसान संभवते. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
आपलेच म्हणणे खरे कराल. अती आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. उघड-उघड शत्रुत्व पत्करू नका. जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. किरकोळ दुखापत संभवते.
