Aajche Rashi Bhavishya 11 March 2026 In Marathi : आज १२ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी रात्री ११ वाजून २९ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर सिद्धी योग जुळून येईल आणि मूळ नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. गुरुवारी तुमच्या राशीवर स्वामींची कशी असणार कृपा जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, १२ मार्च २०२६ (Daily Horoscope 12 March 2026 In Marathi)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन मित्र जोडाल. झोपेची तक्रार जाणवेल. तरुण वर्गात अधिक वेळ घालवाल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. व्यावहारिक कल्पकता वापराल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधवा लागेल. काही बाबी उघडपणे बोलणे टाळाल. अधिकारी व्यक्तींची गाठ घ्यावी लागेल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
मनातील आकांक्षा पूर्ण होतील. चांगली संगत लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. मोठ्या लोकांच्या संगतीत वावराल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
मानसिक ताणापासून दूर राहावे. घरातील वडीलधार्या व्यक्तींचे मत विरोधी वाटू शकते. अंगीभूत कलागुण विकसित होण्यास वाव द्यावा. अति विचार करणे टाळावे. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
जोडीदाराशी विचार-विनिमय कराल. भागीदारीत नवीन योजना आमलात आणाल. मुलांच्या हट्टीपणा कडे लक्ष ठेवा. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
पत्नीची प्रगती होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. जुगारातून लाभ संभवतो. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
पत्नीचा वरचष्मा राहील. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळचा प्रवास जपून करावा. कामाचा जोम वाढेल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
बोलतांना सारासार विचार करून बोलावे. कसलाही उतावीळपणा करायला जाऊ नये. कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजन करावे. घरात नातेवाईक जमा होतील. दिवस हसत-खेळत घालवाल.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
रागाचा पारा आवरता घ्यावा लागेल. आततायीपणे वागू नये. कामाचा जोम वाढीस लागेल. काही अनपेक्षित बदल संभवतात. नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
सामुदायिक गोष्टीपासून दूर राहावे. स्त्रीवर्गापासून सावधानता बाळगावी. धार्मिक यात्रा कराल. प्रवासात सावधानता बाळगावी लागेल. वादविवादात सामील होणे टाळा.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
मनमोकळ्या गप्पा मारता येतील. तुमच्या संभाषण कौशल्यावर सर्व खुश होतील. व्यावहारिक चातुर्य दाखवून द्याल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. हातातील कला जोपासावी.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
वेळेचे महत्व जाणून वागावे. कोणालाही शब्द देतांना विचार करावा. व्यावसायिक लाभाचे योग्य नियोजन करावे. चटपटीत पदार्थ खाल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल
