12th April 2024 Panchang & Rashi Bhavishya: १२ एप्रिलला आज चैत्र शुक्ल चतुर्थीला मराठी नववर्षातील पहिली विनायकी चतुर्थी असणार आहे. आजच्या दिवशी रोहिणी नक्षत्र जागृत असणार आहे तर आजचा संपूर्ण दिवस व १३ एप्रिलच्या मध्यरात्री २ वाजून १३ मिनिटांपर्यंत सौभाग्य योग कायम असणार आहे. आजच्या दिवशी गणपती बाप्पा नेमक्या कोणत्या राशीला आशीर्वाद देणार हे पाहूया, वाचा मेष ते मीन राशीचे आजचे भविष्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२ एप्रिल पंचांग व राशी भविष्य: विनायक चतुर्थी विशेष

मेष:-सेवावृत्तीने कामे हाती घ्याल. फक्त स्वत:चा विचार करू नये. कौटुंबिक प्रेम वाढीस लागेल. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवाव्यात.

वृषभ:-तुमची धार्मिकता वाढीस लागेल. आत्मविश्वासाने कामे हाती घ्याल. सर्वांशी आनंदाने वागाल. हसत-खेळत कामे कराल. चांगला व्यावसायिक लाभ मिळेल.

मिथुन:-घाई घाईने कामे उरकाल. एकाचवेळी अनेक कामात हात घालू नका. व्यावसायिक लाभाकडे विशेष लक्ष ठेवावे. चोरांपासून सावध राहावे. क्षणिक आनंद उपभोगाल.

कर्क:-तुमची समाजप्रियता वाढीस लागेल. कामात मित्रांची मदत होईल. नवीन ओळखी वाढतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. हातातील कामात यश येईल.

सिंह:-वडीलांची उत्तम साथ मिळेल. पारंपरिक कामात प्रगती कराल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

कन्या:-हातून एखादे सत्कार्य घडेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. एखादी नवीन संधि चालून येईल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.

तूळ:-अचानक धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. वैचारिक शांतता जपावी.

वृश्चिक:-वैवाहिक सौख्याला बहर येईल. सहकुटुंब प्रवासाचा आनंद घ्याल. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. जवळचे मित्र गोळा कराल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.

धनू:-घरी जवळचे नातेवाईक गोळा होतील. जवळच्या लोकांशी हितगुज कराल. मानसिक शांतता शोधाल. पत्नीची बाजू समजून घ्यावी. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल.

मकर:-फार अट्टाहास करू नका. जुन्या गोष्टींनी खिन्न होणे टाळावे. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्यावा. सरकारी कामात प्रगती होईल. जोडीदाराचे कौतुक कराल.

कुंभ:-बोलण्यातून इतरांच्या मनाचा ठाव घ्याल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल. चौकसपणे कामाच्या बाबी जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडावेत.

हे ही वाचा<< दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण

मीन:-आवडते पुस्तक वाचाल. सखोल विचारांती निर्णय घ्याल. तुमची वैचारिक उत्क्रांती होईल. भावंडांचे सौख्य लाभेल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12th april panchang rashi bhavishya first vinayak chaturthi of marathi navin varsha ganpati bappa blessing mesh to meen zodiac money svs
First published on: 11-04-2024 at 19:02 IST