12th May 2024 Panchang & Rashi Bhavishya: १२ मे २०२४ म्हणजेच वैशाख शुक्ल पंचमीला रविवार असणार आहे. आजच्या दिवशी आद्रा नक्षत्रात धृती योग जुळून येणार आहे. या दिवशी सूर्य मेष राशीत तर चंद्र मिथुन राशीत असणार आहे. आजच्या दिवशी सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या राशीच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय हे पाहूया..

१२ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-मानसिक अस्वास्थ्याला बळी पडू नका. गायन कलेचे कौतुक केले जाईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

22nd May Panchang Marathi Rashi Bhavishya Vishakha Nakshtra
२२ मे पंचांग: पौर्णिमेचं पडे चांदणं, आज संध्याकाळी विशाखा नक्षत्रात सुरु होईल शुभ मुहूर्त, लक्ष्मीकृपा तुमच्या राशीत आहे का? पाहा
15th May Panchang & Horoscope Marathi
१५ मे पंचांग: दुर्गाष्टमीला तूळ, वृषभसह ‘या’ राशींना माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार? १२ राशींना आज कसा संभवतो धनलाभ
17th May Panchang Marathi Dainik Rashi Bhavishya Friday
१७ मे पंचांग: धनु, मकरसह ‘या’ राशींच्या डोक्यावर वैभवलक्ष्मी ठेवेल हात; जोडीदारामुळे वाटेल आश्चर्य, १२ राशींचे भविष्य वाचा
14th May Marathi Panchang Pushya Nakshtra Rashi Bhavishya
१४ मे पंचांग: आज पुष्य नक्षत्रात मेष, सिंहसह ‘या’ राशींच्या कुंडलीत आनंद बरसणार; मंगळवारी लाभेल मोदकासारखं सुख
shash rajyog and malvyay rajyog
Astrology : दोन खास राजयोगामुळे ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळणार बक्कळ पैसा
Mohini Ekadashi, 19th May Panchang & Rashi Bhavishya
मोहिनी एकादशी, १९ मे पंचांग: रविवारी मेष ते मीनपैकी कुणाच्या नशिबात आज नारायणाची कृपा? वाचा तुमचं राशी भविष्य
20th May Marathi Panchang Daily Rashi Bhavishya
२० मे पंचांग: कामात धनलाभ ते कुटुंबात प्रेम, १२ पैकी ‘या’ ४ राशींना २४ तास जाणार भरभराटीचे; तुमच्या नशिबी आज काय?
Next 45 Days Shani Maharaj Will Turn 180 Degree Saturn Sadesati
४५ दिवसांनी शनी १८० अंशात वळणार; ‘या’ राशींना नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रचंड श्रीमंतीची संधी; घरातील भांडण होईल दूर

वृषभ:-हौस पूर्ण करता येईल. मैत्रीचे संबंध जोडले जातील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. कलेचे आवड जोपासता येईल. मानसिक ताणतणाव दूर सारावा.

मिथुन:-आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. स्त्री वर्गापासून सावध राहावे. क्षणिक मोहाला बळी पडाल. अनाठायी खर्च केला जाईल. मनातील इच्छेला महत्त्व द्याल.

कर्क:-मित्र परिवारात वाढ होईल. दिवस कामात व गडबडीत जाईल. सर्वांना आनंदाने आपलेसे कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल.

सिंह:-कामातून मानाची जागा मिळवाल. उत्कृष्ट बोलण्याने इतरांचे मन जिंकून घ्याल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. कलाकारांचा नाव लौकिक वाढेल.

कन्या:-कला जोपासायला वेळ काढता येईल. धार्मिक कामात मदत कराल. विशाल दृष्टिकोन ठेवून वागाल. कामातील अडथळे दूर होतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

तूळ:-जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणांवरून वाद संभवतो. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न कराल. भागीदारीच्या व्यवसायात सबुरीने वागावे. वारसाहक्काची कामे फायदेशीर ठरतील. अचानक धनलाभ संभवतो.

वृश्चिक:-एकमेकांच्या मताचा आदर करावा. आपले मत शांतपणे मांडावे. सहकार्‍यांना सोबत घेऊन चालावे. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. प्रवासात सावधानता बाळगावी.

धनू:-लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. आळस झटकून कामाला लागावे. रेस सट्टा सारख्या व्यवहारात सतर्क रहा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. नातेवाईकांची मदत मिळेल.

मकर:-प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल. व्यवहारी भूमिका घ्यावी लागेल. तुमच्या छंदाचे कौतुक केले जाईल. गप्पा गोष्टी करण्यामध्ये गुंग व्हाल. सहवासातून नवीन संबंध दृढ होतील.

कुंभ:-घरगुती सुख सोईंकडे लक्ष द्याल. कौटुंबिक कटुता टाळण्याचा प्रयत्न करा. घरातील टापटि‍पी बाबत आग्रही राहाल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. क्षुल्लक गोष्टींवरून त्रागा करू नये.

मीन:-नातेवाईकांशी सलोखा वाढेल. कलेची आवड जोपसाता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. खाण्यापिण्याची आवड दर्शवाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर