12th September Rashi Bhavishya & Panchang : आज १२ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे.नवमी तिथी आज रात्री ११ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज मूळ नक्षत्र ९ वाजून ५१ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच आज आयुष्मान योग रात्री १० वाजून ४१ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असेल. तसेच आज गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. तर आजचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा असणार आहे हे आपण जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य : (12th September Rashi Bhavishya & Panchang)

मेष:- मान्य नसलेल्या गोष्टीला सहमती दर्शवू नका. संमिश्र घटनांचा दिवस. लाभाच्या काही संधी प्राप्त होतील. गुंतवणूक लाभदायक ठरेल. धार्मिक गोष्टीत मन रमेल.

वृषभ:- भागीदारीत काळजीपूर्वक पैसा गुंतवा. अती घाई टाळा. इतरांचे म्हणणे ऐकून घ्या. चटकन निर्णयावर येऊ नका. मानसिक शांतता जपावी.

मिथुन:- स्वत:वर खर्च करा. पराक्रम योग्य ठिकाणी दाखवा. नफा-तोट्याकडे लक्ष ठेवा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. कामातील बदलांना सामोरे जा.

कर्क:- अती लोभ टाळावा. आपली जोखीम ओळखून कामे करा. दिलासादायक दिवस जाईल. कुटुंबातील सदस्य समजून घेतील. कामातून मनासारखे समाधान मिळेल.

सिंह:- व्यावसायिक संधीकडे लक्ष ठेवा. हातातील अधिकार वापरता येतील. नवीन अनुभव गाठीशी बाळगाल. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. आनंद वार्ता मिळू शकतील.

कन्या:- योग्य सल्ल्याने लोकांचे समाधान कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. जुन्या गोष्टी विसरून पुढे जा.

तूळ:- नवीन संधीने खुश व्हाल. थोडी तडजोड करावी लागेल. अती श्रमामुळे थकवा जाणवू शकतो. कौटुंबिक गैरसमज दूर करावेत. ज्येष्ठ मंडळींची गाठ पडेल.

वृश्चिक:- प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची स्वतंत्र मते समजून घ्या. क्षुल्लक कारणांवरून चीडू नका. केवळ कामावर लक्ष केन्द्रित कराल. वादाचे प्रसंग टाळा.

धनू:- दिवस मनासारखा घालवाल. मनाला चांगल्या विचारात गुंतवून ठेवा. कौटुंबिक समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. समाधानकारक घटना घडतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

मकर:- तुमच्या शांत स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. मानसिक स्वास्थ्य हरवू नका. समोरील प्रश्न शांतपणे सोडवावेत. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहा. धार्मिक ग्रंथांचे वाचन चालू ठेवा.

कुंभ:- चटकन धाडसी निर्णय घेऊ नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. गुरुजनांचा सल्ला विचारात घ्या. वेळेचा सदुपयोग करावा. लाभाची संधी सोडू नका.

मीन:- व्यावसायिक ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. अडकलेले पैसे प्राप्त होऊ शकतील. शक्तीच्या जोरावर समस्या सोडवू शकाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12th september rashi bhavishya ayushman yog blessed you with love money success and read marathi daily horoscope dvr
Show comments