Shukraditya Rajyog: १४ एप्रिल २०२६ रोजी सूर्यदेव मेष राशीत प्रवेश करणार आहेत, याला ज्योतिषशास्त्रात मेष संक्रांत असे म्हटले जाते. यावेळी खास गोष्ट अशी आहे की तिथे आधीपासूनच शुक्रदेव विराजमान असतील. त्यामुळे सूर्य आणि शुक्र यांची भेट होईल. सूर्य आणि शुक्र एकत्र आले की शुक्रादित्य राजयोग तयार होतो. हा योग एप्रिलच्या शेवटपर्यंत राहणार आहे. हा योग ४ राशींचे नशीब उजळवणार आहे. चला जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत.

मेष राशी (Aries Horoscope)

सूर्य तुमच्या स्वतःच्या राशीत येत असल्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये खूप ऊर्जा जाणवेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. मनातील भीती दूर होईल. लोक तुमचे बोलणे लक्ष देऊन ऐकतील. ऑफिसमध्ये किंवा समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. अडकलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

तुमच्यासाठी हा काळ धनलाभाचा आहे. पैशांशी संबंधित ज्या अडचणी सुरू होत्या, त्या हळूहळू दूर होतील. कमाईचे नवीन मार्ग खुलतील. जर तुम्ही कुठे पैसे गुंतवले असतील, तर तिथून चांगला नफा मिळू शकतो.

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये प्रगती घेऊन येणार आहे. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. जर तुम्ही प्रमोशन किंवा नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर चांगली संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांनाही मोठी ऑर्डर किंवा चांगला नफा मिळू शकतो.

सिंह राशी (Leo Horoscope)

सूर्य तुमचे स्वामी ग्रह असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी गोल्डन पीरियडसारखा ठरणार आहे. नशीब तुमची साथ देईल. जी कामे खूप मेहनत करूनही होत नव्हती, ती आता सहज पूर्ण होतील. घर-परिवारात आनंद आणि सुख-शांती येईल. समाजात तुमचा प्रभाव वाढेल.

लाभासाठी काय करावे?

या काळाचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी रोज सकाळी सूर्यदेवांना जल अर्पण करा. गरजू लोकांना गूळ किंवा लाल कपड्यांचे दान करा. हा काळ आळस सोडून मेहनत करण्याचा आहे, कारण ग्रह पूर्णपणे तुमच्या बाजूने आहेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)