Horoscope Today 14 november 2025 : आज १४ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी असणार आहे. आज ब्रम्ह योग जुळून येईल आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे आणि वैधृती योग सुद्धा जुळून येतो आहे. राहू काळ १० वाजून ४२ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून १ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ४० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत असणार आहे. दिनविशेष पाहिल्यास आज बालदिन असणार आहे. तर शुक्रवारी १२ राशींच्या आयुष्यात काय नवं घडणार जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५ (Today Horoscope 14 November 2025 In Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. एकमेकातील एकोपा वाढीस लागेल. कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)

कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. सहकारी वर्गाशी सलोखा वाढेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. मात्र काही संधी मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

प्रेम सौख्यात वाढ होईल. गायन कलेला योग्य दाद मिळेल. आवडते छंद जोपासले जातील. करमणुकीत अधिक काळ रमाल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)

घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. मानसिक चलबिचलता जाणवेल. काही गोष्टी आपल्याला विस्मित करतील. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)

नातलगांशी जवळीक वाढेल. प्रवासाची हौस भागवता येईल. चांगली कल्पनाशक्ती वाढीस लागेल. हातून एखादे सत्कार्य घडेल. हस्त कलेचे कौतुक केले जाईल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)

आपली इतरांवर छाप पडेल. गोड वाणीने सर्वांना आपलेसे कराल. आर्थिक बाजू सुधारेल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)

सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)

काही बाबीत पिछेहाट झाल्यासारखे वाटू शकते. आपली जिद्द व चिकाटी कायम ठेवावी लागेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. सूर्याची उपासना करावी.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

हातातील कामात यश येईल. मनोकामना पूर्ण होईल. आर्थिक गणिते आपल्या मनाप्रमाणे घडून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल उचलावे.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)

मनातील निराशाजनक विचार दूर सारावेत. जुन्या गोष्टी आठवून खट्टू होऊ नका. मानसिक सौख्याला प्राधान्य द्यावे. आर्थिक बाजू सुधारेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

इतरांना स्वखुशीने मदत कराल. परोपकारी वृत्तीत वाढ होईल. चांगली संगत लाभेल. ऐषारामाच्या साधनांची खरेदी कराल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)

मानसिक चंचलता जाणवेल. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतील. चांगला धनलाभ संभवतो. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. हातातील कामात यश येईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर