14th September Rashi Bhavishya & Panchang : आज १४ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी रात्री ८ वाजून ४२ पर्यंत चालेल. तसेच आज शोभन योग संध्याकाळी ६ वाजून १७ मिनिटांपर्यंत राहील. शनिवारी उत्तराषाढा नक्षत्र रात्री ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे राहील. आज राहुकाळ सकाळी ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तर आज १२ राशींच्या कुंडलीत नक्की काय लिहून ठेवलंय चला जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१४ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- मानसिक विकासासाठी बळ एकजूट करा. मनातील संमिश्र विचार काढून टाका. अधिकारी वर्गाशी मतभेद संभवतात. कौटुंबिक सदस्यांची साथ मिळेल. दिवसभर कामाची गडबड राहील.

वृषभ:- घरातील कामासाठी पैसे खर्च होतील. दिवस आव्हानात्मक असेल. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. महागड्या वस्तु सांभाळून ठेवा. सावधगिरीने परिस्थिती हाताळा.

मिथुन:- कुटुंबात मान वाढेल. तुमच्या कल्पकतेचे कौतुक केले जाईल. प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करा. निश्चयाने कामे तडीस न्यावीत. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.

कर्क:- आजारांकडे दुर्लक्ष करू नका. लहान गोष्टी सुद्धा अंगावर काढू नका. कोणतीही जोखीम पत्करताना सावध रहा. आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या. जोडीदाराशी विचार विनिमय करा.

सिंह:- दिवस चांगला जाईल. मेहनतीचे चीज होईल. उदार मनाने क्षमाशील राहाल. जोडीदाराची मदत घ्याल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

कन्या:- आळसात दिवस घालवू नका. नातेवाईक भेटतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे.

तूळ:- आपले मत सर्वांसमोर मांडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजनेवर काम कराल. घरातील जबाबदारी अंगावर पडेल. आवडीसाठी खर्च कराल.

वृश्चिक:- नातेवाईकांशी जुळवून घ्या. भावनात्मक प्रसंग घडू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. गोड बोलून कामे करून घ्या. नवीन ओळख होईल.

धनू:- आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व दाखवून द्या. त्यातून लाभच होईल. नातेवाईक आनंदवार्ता देतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सकारात्मकता वाढीस लागेल.

मकर:- भावंडांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दिवस मर्जीप्रमाणे घालवाल. मनातील नकारात्मकता काढून टाका. धार्मिक गोष्टीत सहभागी व्हा.

कुंभ:- मनातील निराशा झटकून टाका. ध्यानधारणेत मन रमवा. तणावाखाली नवीन गोष्ट करू नका. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या.

मीन:- नवीन संधी चालून येतील. योग्य वेळी पाऊले उचला. परंतु सारासार विचारांची जोड घ्या. क्षुल्लक वादापासून दूर रहा. दूरच्या मित्रांशी संपर्क साधाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14th september shanivar rashi bhavishya shobhan yog blessed you with all good apportunity in love personal life read marathi daily horoscope asp
Show comments