15 January Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार २०२५ सालाच्या सुरुवातीला अनेक ग्रह आपली रास बदलतील आणि शुभ योग तयार होतील. याचा परिणाम माणसांच्या जीवनावर तसेच देश-दुनियेवर दिसून येईल.

१५ जानेवारी २०२६ रोजी धनाचा कारक शुक्र आणि कर्मफळ देणारा शनी हे दोन्ही ग्रह लाभ दृष्टि योग तयार करतील. कारण या दिवशी शुक्र आणि शनी एकमेकांपासून ९० अंशावर असतील. या स्थितीमुळे लाभ दृष्टि योग बनेल. या योगामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

मकर राशी (Capricorn Horoscope)

तुमच्यासाठी शुक्र आणि शनीचा लाभ दृष्टि योग फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. तसेच नवीन नोकरी मिळण्याची किंवा व्यवसायातून फायदा होण्याची संधी मिळू शकते. या काळात कुटुंबात आणि नातेसंबंधात समजूतदारपणा वाढेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील आणि मन शांत राहील.

या वेळेत तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. पैशांचे नवीन मार्ग खुले होतील. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

तूळ राशी (Libra Horoscope)

शनी आणि शुक्र यांचा लाभ दृष्टि योग तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात काम-धंद्यात प्रगती होऊ शकते. तसेच पैसे साठवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

नोकरी करणाऱ्यांना इन्क्रिमेंट, बोनस किंवा प्रमोशनची चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन डील, भागीदारी आणि नफ्याचा ठरेल. या काळात वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्याचीही शक्यता आहे.

कन्या राशी (Virgo Horoscope)

शुक्र आणि शनी यांचा लाभ दृष्टि योग कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात बेरोजगार लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

तसेच उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते आणि नवीन मार्गांनी तुम्ही पैसे कमवू शकता. आर्थिक परिस्थिती आधीपेक्षा सुधारेल. या काळात अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. कुटुंबातील बाबतीतही परिस्थिती तुमच्या फायद्याची राहील. तसेच या वेळेत तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)