15 May Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि बुध यांची युती खूप शुभ मानली जाते. असं म्हटलं जातं की, ज्यांच्या कुंडलीत हे दोन्ही ग्रह एकत्र असतात, त्या लोकांना व्यवसायात मोठं यश मिळतं. तसेच हे लोक अभ्यासातही खूप हुशार असतात. १५ मे रोजी सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे ४ राशींचं नशीब चमकू शकतं. चला जाणून घेऊया, या दुहेरी गोचराचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

‘या’ ४ राशींची लागणार लॉटरी

वृषभ राशी (Taurus Horoscope)

१५ मे रोजी होणारं हे दुहेरी गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतं. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती आधीपेक्षा मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि बढती मिळण्याचे योग आहेत.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हे दुहेरी गोचर एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते. मान-सन्मान वाढेल. परदेशात नोकरी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतूनही चांगला फायदा मिळू शकतो.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही भरघोस नफा मिळू शकतो. मोठी डील फायनल होण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा मिळू शकतो. घर किंवा मालमत्तेचं सुख मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

हे दुहेरी गोचर तुम्हाला व्यवसायात मोठा फायदा देऊ शकतं. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल, तर चांगली कमाई होऊ शकते. जोडीदाराच्या मदतीने मोठं आर्थिक यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीचे चांगले ऑफर मिळू शकतात. जुन्या कर्जातूनही मुक्ती मिळू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)