Rajyog Effects on Zodiac Signs in May: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धीचा कारक बुध ठराविक काळानंतर राशी बदलतो, ज्याचा परिणाम सर्व राशींवर तसेच जागतिक स्तरावरही दिसून येतो. सध्या बुध मेष राशीत सूर्याबरोबर आहे. तसेच १५ मे रोजी राशी बदलून तो शुक्राच्या राशी वृषभमध्ये प्रवेश करेल. या राशीत आल्यानंतर तो पुन्हा सूर्याबरोबर युती करून बुधादित्य राजयोग तयार करेल. यासोबतच काही भावांमध्ये केंद्र-त्रिकोण राजयोगही तयार होईल. या राजयोगामुळे १२ राशींच्या जीवनावर काही ना काही परिणाम दिसेल. मात्र या तीन राशींच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे. चला या राशींबद्दल जाणून घेऊया…
द्रिक पंचांगानुसार, व्यापाराचा कारक बुध १५ मे २०२६, शुक्रवार, रात्री १२:३४ वाजता वृषभ राशीत प्रवेश करेल आणि २९ मेपर्यंत त्याच राशीत राहील. त्यानंतर तो आपल्या स्वतःच्या मिथुन राशीत जाईल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, केंद्र-त्रिकोण राजयोग तेव्हा तयार होतो जेव्हा जन्मकुंडलीतील केंद्र भाव (१, ४, ७, १०) आणि त्रिकोण भाव (१, ५, ९) यांच्या स्वाम्यांमध्ये संबंध म्हणजे युती, दृष्टी किंवा स्थान बदल होतो. हा राजयोग तयार झाल्यावर व्यक्तीला सुख-समृद्धी, करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात मोठा फायदा मिळू शकतो.
वृषभ राशीवर केंद्र-त्रिकोण राजयोगाचा परिणाम (Taurus Zodiac)
या राशीत बुध आणि सूर्यामुळे बुधादित्य योग तसेच केंद्र-त्रिकोण राजयोग तयार होईल. या राशीच्या लग्न भावात बुध असेल. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि धन-धान्य वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात मोठा नफा मिळण्याचे योग आहेत. सुख-सुविधा वाढतील. पार्टनरशिपमध्ये केलेल्या व्यवसायातही फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. नवीन नोकरी शोधणाऱ्यांनाही फायदा होईल. भविष्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता, ज्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल.
कुंभ राशीवर केंद्र-त्रिकोण राजयोगाचा परिणाम (Aquarius Zodiac)
या राशीच्या चौथ्या भावात बुध असेल. तसेच राहू लग्नात आणि शनी धन भावात आहे. सूर्यही चौथ्या भावात असल्यामुळे पुन्हा केंद्र-त्रिकोण राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनाही चांगला फायदा होऊ शकतो. कुंडलीत अनेक सकारात्मक योग तयार होत आहेत. ग्रहांची स्थिती मजबूत असल्यामुळे तुमच्या प्रयत्नांना यश मिळू शकते. राहूमुळे नवीन आणि वेगळ्या कल्पना येतील, ज्यामुळे तुम्ही नवीन पद्धतीने काम करू शकता. यामुळे व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल. घर, वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. सुख-सुविधा वाढतील.
शनिमुळे परदेशाशी संबंधित कामांमध्येही फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला आहे, कारण शिक्षण आणि बुद्धीशी संबंधित भाव सक्रिय आहेत.
वृश्चिक राशीवर केंद्र-त्रिकोण राजयोगाचा परिणाम (Scorpio Zodiac)
या राशीच्या गोचर कुंडलीच्या सातव्या भावात बुध आणि सूर्य एकत्र असतील. त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल होण्याचे संकेत आहेत. तसेच शनी पंचम भावात आणि राहू चतुर्थ भावात आहे. त्यामुळे तुमच्या जन्मकुंडलीतील ग्रहांची स्थिती, दशा आणि दृष्टी यावर परिणाम अवलंबून असेल. मे महिन्यात केंद्र आणि त्रिकोण राजयोग तयार होत असल्यामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. कामाच्या ठिकाणी अडथळे दूर होतील. तांत्रिक, वैद्यकीय, क्रीडा किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातील लोकांना विशेष फायदा होऊ शकतो.
बुध आणि सूर्यामुळे चांगले परिणाम मिळतील. उत्पन्नात वाढ होईल आणि पैसे साठवण्याचे योग आहेत. राहूमुळे मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित अचानक फायदा होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
