15 May Horoscope Surya Gochar: १५ मे रोजी सूर्य ग्रह आपल्या उच्च राशी मेषमधून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. वृषभ राशीत सूर्याच्या आगमनामुळे अनेक राशींच्या जीवनात चांगले-वाईट बदल पाहायला मिळू शकतात. मात्र राशिचक्रातील पाचवी रास सिंहसाठी हे गोचर खूपच लाभदायक ठरू शकते.
सिंह ही सूर्याची स्वतःची रास आहे आणि वृषभ राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्य सिंह राशीच्या दहाव्या भावात राहतील. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य दहाव्या भावात शक्तिशाली होतात म्हणजेच त्यांना दिशाबल प्राप्त होते. शक्तिशाली झाल्यावर प्रत्येक ग्रह अधिक शक्तिशाली होतो. त्यामुळे १५ मेपासून सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याची ही स्थिती अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. सूर्याच्या या प्रभावामुळे १५ मे ते १५ जून हा काळ सिंह राशीसाठी गोल्डन पीरियड ठरू शकतो.
सिंह राशीला मिळतील असे परिणाम
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्म्याचा कारक ग्रह मानले जाते. तसेच सरकारी क्षेत्र, प्रतिष्ठा, नेतृत्वगुण यांचाही कारक सूर्यच मानला जातो. त्यामुळे सूर्य शक्तिशाली झाल्यामुळे सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात. १५ मेनंतर उत्पन्नाचे अतिरिक्त मार्गही मिळण्याची शक्यता आहे.
समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि राजकारणाशी संबंधित लोकांना अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळू शकते. सरकारी क्षेत्रातूनही या राशीच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळू शकते. तसेच कौटुंबिक जीवनातही चांगले बदल अनुभवायला मिळतील. तुमची काम करण्याची क्षमता वाढेल, त्यामुळे कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रभावित होतील.
या काळात विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा फायदा मिळू शकतो. शक्तिशाली सूर्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल. सूर्याच्या या स्थितीमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यातही चांगले बदल होण्याची शक्यता आहे. काही नोकरी करणाऱ्या लोकांना वृषभ राशीत सूर्याच्या गोचरादरम्यान उच्च पद मिळण्याचे योग आहेत. आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळू शकतात, फक्त सतर्क राहण्याची गरज आहे. एकूणच पाहता, सूर्याचे वृषभ राशीत होणारे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी गोल्डन पीरियड ठरू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
