Horoscope Today 15 october 2026 In Marathi : आज १५ ऑक्टोबर २०२६ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असणार आहे. आज सौभाग्य योग आणि ज्येष्ठ नक्षत्र जुळून येईल. राहू काळ १२ वाजून १८ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज कोणताही अभिजात मुहूर्त नसेल. आज नवरात्रीचा पाचवा दिवस आणि आजचा रंग पिवळा असणार आहे. आज स्कंदमाता देवीच्या रूपाची पूजा केली जाईल. नवरात्रीचा पाचवा दिवस तुमच्यासाठी बातमी घेऊन येणार जाणून घेऊ.
आजचे पंचांग व राशिभविष्य, १५ ऑक्टोबर २०२६ (Today Horoscope 15 october 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
घरात शुभ कार्य ठरेल. वाहन विषयक काम निघेल. एखादी चांगली वार्ता मिळेल. मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. नात्यांमधील विश्वास वाढीस लागेल.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
लहान प्रवास घडेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. कर्तृत्वात वाढ होईल. मानसिक स्वास्थ्य जपावे. मनातील इच्छेबाबत आग्रही राहाल.
दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
विषयास अनुसरून बोलावे. अचानक धनलाभ संभवतो. घरातील गोष्टींबाबत दक्ष राहावे. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. अपचनाचा त्रास संभवतो.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
दिवसाची सुरुवात आनंददायी होईल. दिनक्रमात बदल कराल. अति उत्साहाने कामे करू नका. भागीदारीत आंधळा विश्वास ठेऊ नका. घाईने काम बिघडू शकते.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
मनाला न पटणार्या गोष्टीला होकार देऊ नका. कौटुंबिक गोष्टींसाठी खर्च कराल. तुमच्या मताला विरोध होऊ शकतो. निष्काळजीपणे वागू नका. भावनात्मक निर्णय टाळावा.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. धावपळीचे योग्य वेळी लाभ मिळतील. कामातून आनंद शोधाल. सर्वांशी प्रेमाने वागाल. प्रिय व्यक्तीची गाठ पडेल.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
अघळपघळ बोलू नका. स्वच्छ व स्पष्ट मत मांडा. हातातील सर्व कामे सुरळीत पार पडतील. एखादा नवीन अनुभव गाठीशी बांधाल. जन संपर्कातून लाभ होईल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
फसवणुकीपासून सावध रहा. झोपेची तक्रार जाणवेल. तुमचे मत विचारात घेतले जाईल. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. जास्त जबाबदारी अंगावर घेऊ नका.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
समोरच्याचा मान ठेवून वागा. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. दिग्गज मंडळींच्या भेटीचे योग येतील. काळ आणि वेळ लक्षात घ्या.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
चांगल्या कामासाठी पैसा खर्च केला जाईल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. कामे पूर्णत्वास नेण्यास प्रयत्नशील रहा. घरातील गोष्टी चिघळू देऊ नका. डोकेदुखीचा त्रास संभवतो.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
उत्तम लाभामुळे दिवस आनंदात जाईल. विनाकारण तर्क-वितर्क करू नका. वडीलांची साथ मोलाची ठरेल. योग्य नियोजनाने काम पूर्णत्वास जाईल. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीचा योग.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
बोलताना शब्दांचे थोडे भान ठेवा. एखाद्या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ कराल. मेहनत व परिश्रम यांची कास सोडू नका. अचानक आलेल्या अडचणी संयमाने सोडवा. खर्चात वाढ होण्याची शक्यता.
