15th June Panchang & Rashi Bhavishya: १५ जून २०२४ ला ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्ष नवमी तिथी आहे. शनिवारच्या दिवशी नवमी तिथी मध्यरात्री २ वाजून ३३ मिनिटांपर्यंत कायम असणार आहे. १५ जूनला सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सुरु होऊन रविवारी मध्यरात्री २ वाजून १५ मिनिटांपर्यंत रवी योग कायम असणार आहे. तर शनिवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांपर्यंत उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे व त्यानंतर हस्त नक्षत्राचा उदय होईल. कालच म्हणजे १४ जून बुध ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आजपासून त्याचा सुद्धा स्पष्ट प्रभाव दिसू लागेल. बुध शुक्राच्या युतीने मिथुन राशीत तयार झालेल्या लक्ष्मी नारायण योगाचा प्रभाव सुद्धा काही राशींवर असणार आहे. एकूणच मेष ते मीन राशीला आजच्या दिवशी कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. दिवस फारसा अनुकूल नाही. अधिक मेहनतीची गरज भासेल. कामाचे योग्य नियोजन करा.

वृषभ:-वायफळ गोष्टींपासून दूर रहा. फक्त आपल्या कामावरच लक्ष केन्द्रित करावे. मैत्रीत सलोखा ठेवावा. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. सकारात्मक विचार करावेत.

मिथुन:-नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. काम वेळेवर पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. अति घाई करून चालणार नाही. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा लागेल. अचानक आलेल्या समस्येतून मार्ग निघेल.

कर्क:-विचारांना योग्य दिशा द्यावी. कोणत्याही गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाहीत. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.

सिंह:-आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. अधिकारी वर्गाचे सहाय्य लाभेल. मैत्रीचे नवीन संबंध प्रस्थापित होतील. इतरांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला चांगल्या बातमीची प्रतीक्षा राहील.

कन्या:-आर्थिक लाभाबाबत सतर्क राहावे. मानभंगाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराचा तुमच्यावर वचक राहील. डोक्यात काहीसा गोंधळ चालू राहील. सरकारी कामे अडकून पडू शकतात.

तूळ:-महत्त्वपूर्ण लोकांशी ताळमेळ जुळून येईल. आर्थिक स्थितीचा विचार कराल. नवीन जबाबदारी सामोरी येईल. चांगल्या गुंतवणुकीला वाव आहे. दिवसभर कामात व्यग्र राहाल.

वृश्चिक:-काही निर्णय अचानक घ्यावे लागू शकतात. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. मुलांची काळजी लागून राहील. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. पारमार्थिक कामात सहकार्य कराल.

धनू:-फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. नवीन लोकांसोबत चर्चा कराल. भावनांवर संयम ठेवावा. घरातील वातावरण शांततामय ठेवावे. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा.

मकर:-चिकाटी सोडून चालणार नाही. जवळच्या प्रवासात अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. काही गोष्टीत धीर धरावा लागेल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.

कुंभ:-हाताखालील लोकांवर लक्ष ठेवा. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. मनातील संकोच काढून टाकावा. बोलतांना शब्द जपून वापरावेत. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे.

हे ही वाचा<< शनीदेव धमाक्यासाठी सज्ज! जून संपण्याआधी सर्वच राशीत बदलांचे वारे, १५ नोव्हेंबरपर्यंत अपार श्रीमंत होतील ‘या’ राशी

मीन:-अति घाई त्रासदायक ठरू शकेल. आपल्या अपेक्षा संतुलित ठेवा. क्षुल्लक कारणावरून चिडचिड करणे टाळा. जवळचे मित्र मदत करतील. घरगुती कामात अधिक लक्ष घालावे.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15th june marathi panchang lakshmi narayan yog active from today hasta nakshtra ravi yog mesh to meen rashi bhavishya aries to pisces horoscope svs