15th September Rashi Bhavishya & Panchang : आज १५ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी आज संध्याकाळी ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज श्रवण नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. आज अतिगण्ड योग सुद्धा जुळून आला आहे ; जो ६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच राहू काळ दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल. तर आज १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत तर कोणत्या राशीचा दिवस त्रासदायक जाईल हे आपण जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- घरात शुभ कार्य ठरेल. वाहन विषयक काम निघेल. एखादी चांगली वार्ता मिळेल. मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. नात्यांमधील विश्वास वाढीस लागेल.

वृषभ:- लहान प्रवास घडेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. कर्तृत्वात वाढ होईल. मानसिक स्वास्थ्य जपावे. मनातील इच्छेबाबत आग्रही राहाल.

मिथुन:- विषयास अनुसरून बोलावे. अचानक धनलाभ संभवतो. घरातील गोष्टींबाबत दक्ष राहावे. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. अपचनाचा त्रास संभवतो.

कर्क:- दिवसाची सुरुवात आनंददायी होईल. दिनक्रमात बदल कराल. अति उत्साहाने कामे करू नका. भागीदारीत आंधळा विश्वास ठेऊ नका. घाईने काम बिघडू शकते.

सिंह:- मनाला न पटणार्‍या गोष्टीला होकार देऊ नका. कौटुंबिक गोष्टींसाठी खर्च कराल. तुमच्या मताला विरोध होऊ शकतो. निष्काळजीपणे वागू नका. भावनात्मक निर्णय टाळावा.

कन्या:- स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. धावपळीचे योग्य वेळी लाभ मिळतील. कामातून आनंद शोधाल. सर्वांशी प्रेमाने वागाल. प्रिय व्यक्तीची गाठ पडेल.

तूळ:- अघळपघळ बोलू नका. स्वच्छ व स्पष्ट मत मांडा. हातातील सर्व कामे सुरळीत पार पडतील. एखादा नवीन अनुभव गाठीशी बांधाल. जन संपर्कातून लाभ होईल.

वृश्चिक:- फसवणुकीपासून सावध रहा. झोपेची तक्रार जाणवेल. तुमचे मत विचारात घेतले जाईल. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. जास्त जबाबदारी अंगावर घेऊ नका.

धनू:- समोरच्याचा मान ठेवून वागा. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. दिग्गज मंडळींच्या भेटीचे योग येतील. काळ आणि वेळ लक्षात घ्या.

मकर:- चांगल्या कामासाठी पैसा खर्च केला जाईल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. कामे पूर्णत्वास नेण्यास प्रयत्नशील रहा. घरातील गोष्टी चिघळू देऊ नका. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

कुंभ:- उत्तम लाभामुळे दिवस आनंदात जाईल. विनाकारण तर्क-वितर्क करू नका. वडीलांची साथ मोलाची ठरेल. योग्य नियोजनाने काम पूर्णत्वास जाईल. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीचा योग.

मीन:- बोलताना शब्दांचे थोडे भान ठेवा. एखाद्या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ कराल. मेहनत व परिश्रम यांची कास सोडू नका. अचानक आलेल्या अडचणी संयमाने सोडवा. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15th september daily horocope mest to meen rashi bhavishya rashi these zodic signs should keep eye on their success money love life read aajche rashi bhavishya asp
Show comments