Aajche Rashi Bhavishya 16 April 2026 In Marathi : आज १६ एप्रिल २०२६ रोजी चैत्र कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी रात्री ८ वाजून १२ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर दुपारी १० वाजून २८ मिनिटांपर्यंत इंद्र योग जुळून येईल आणि त्यानंतर वैधृती योग जुळून येईल. दुपारी १ वाजून ५९ मिनिटांपर्यंत उत्तरा भाद्रपद नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ २ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून ४३ मिनिटांपर्यंत असणार आहे. गुरुवारी तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय वाचा…

आजचे पंचांग व राशिभविष्य, १६ एप्रिल २०२६ (Horoscope Today 16 April 2026 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

आवडी निवडीबद्दल दक्ष राहाल. कामाचा अतिरिक्त तान जाणवेल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. प्रेमळपणे सर्वांना जिंकून घ्याल. बोलण्यातून उत्तम छाप पाडाल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. सर्व गोष्टींत मना पासून रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. काही गोष्टी उघडपणे बोलणे तळाल. आरोग्याची हयगय करू नका. नवीन मित्र जोडले जातील.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

तुमची समाजप्रियता वाढेल. सरकारी कामे पूर्ण होतील. स्त्री वर्गाशी मैत्री कराल. मित्रा परिवारात वाढ होईल. उत्तम व्यावसायिक कमाई करता येईल.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

तुमच्या कलेला योग्य प्रशस्ती मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. इतरांची माने जिंकून घ्याल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. दिवस भाग्यकारक ठरेल.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

धार्मिक वृत्तीत वाढ होईल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. छंद जोपासण्यात रमून जाल. नवीन विषयात रुचि दाखवाल. हातून एखादेसत्कार्य घडेल.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

कमी श्रमात कामे पार पडतील. जोडीदाराचे कौतुक कराल. शेअर्स मधून लाभ संभवतो. व्यावहारिक दृष्टीने विचार कराल.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

वैवाहिक सौख्यात भर पडेल. तुमच्यातील अहंमन्यता वाढीस लागेल. एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत चांगला लाभ होईल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

नातेवाईकांची मदत घेता येईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. दिवस काहीसा आळसात जाईल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी कराल. काटकसरी कडे लक्ष द्या.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

रागावर नियंत्रण ठेवावे. रेस जुगार यांतून लाभ संभवतो. मैत्रीतील घनिष्टता वाढेल. प्रेम सौख्याला बहार येईल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

हातात नवीन अधिकार येतील. जवळच्या ठिकाणच्या प्रवासाचा योग येईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवस आनंदात जाईल. जवळचे मित्र भेटतील.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. हातातील कलेला वाव द्यावा. इतरांचे मनापासून कौतुक कराल. चांगली कल्पना शक्ति लाभेल. हस्त कलेचा आनंद घ्याल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर