16 May Horoscope: चंद्र ग्रह भावना आणि मनाचे कारक मानले जातात. सध्या चंद्र ग्रह तूळ राशीत गोचर करत आहेत. ज्योतिष शास्त्रात शनी जयंतीला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, १६ मे २०२६ रोजी शनी जयंती येत आहे. या दिवशी चंद्र ग्रहाची चाल बदलणार आहे. शनी जयंतीच्या दिवशी चंद्र राशी बदल आणि नक्षत्र बदल करणार आहे. १६ मे रोजी रात्री १० वाजून ४६ मिनिटांनी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत चंद्र १८ मेपर्यंत राहणार आहे.
सध्या चंद्र ग्रह विशाखा नक्षत्रात आहेत. शनी जयंतीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांनी चंद्र कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करेल. कृत्तिका नक्षत्रात चंद्र १७ मे २०२६ पर्यंत राहील. चंद्राच्या या गोचरामुळे काही राशींना चांगले परिणाम मिळू शकतात, तर काहींसाठी थोडा कठीण काळ सुरू होऊ शकतो. चला जाणून घेऊया, चंद्राच्या या डबल गोचरामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.
शनी जयंतीला चंद्र गोचर – ‘या’ राशींचे नशीब चमकणार
सिंह राशीसाठी चंद्राचं डबल गोचर कसं असेल?
शनी जयंतीच्या दिवशी चंद्राचं डबल गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. घरात सुख-शांती राहील. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रमोशन मिळू शकते.
धनु राशीसाठी चंद्राचं डबल गोचर कसं असेल?
शनी जयंतीच्या दिवशी चंद्राचं डबल गोचर धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. बॉस आणि सहकाऱ्यांच्या मदतीने कामे व्यवस्थित पूर्ण होतील. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील. परदेश प्रवासाची शक्यता आहे. मात्र, आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन राशीसाठी चंद्राचं डबल गोचर कसं असेल?
शनी जयंतीच्या दिवशी चंद्राचं डबल गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतं. घरात सुख-शांती राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. मित्राच्या मदतीने अडचणी दूर होतील. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
