Shani Gochar: शनिश्चरी अमावस्या १६ मे २०२६ रोजी शनिवारी आहे. त्यानंतरच्या दिवशी म्हणजे १७ मे रविवारी शनि ग्रह सायंकाळी ३ वाजून ४९ मिनिटांनी उत्तराभाद्रपदा नक्षत्रातून रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनीच्या या नक्षत्र गोचरामुळे ५ राशींसाठी चांगल्या काळाची सुरुवात होणार आहे.
मेष राशी (Aries Horoscope)
शनीचे नक्षत्र बदलणे मेष राशीच्या लोकांसाठी चांगले ठरणार आहे. या गोचरामुळे मेष राशीच्या लोकांना आर्थिक प्रगती मिळू शकते. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. एखादी मोठी डील झाल्यामुळे चांगला नफा मिळू शकतो.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
शनीचे नक्षत्र गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीसाठी हा काळ चांगला राहील. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
शनीचा रेवती नक्षत्रात प्रवेश मिथुन राशीच्या लोकांना लाभदायक ठरेल. तुम्हाला करिअरमध्ये प्रगती मिळेल. नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळू शकतात. या संधींचा योग्य फायदा घ्यावा.
कन्या राशी (Virgo Horoscope)
१७ मे रोजी शनीचा रेवती नक्षत्रात प्रवेश कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ फल देणारा ठरेल. करिअरमध्ये प्रगतीचे योग तयार होतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीचे गोचर शुभ ठरू शकते. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. एखादे मोठे काम मिळाल्यामुळे फायदा होईल. परदेशात नोकरी करण्याचा विचार करत असाल, तर चांगली संधी मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
