17 May Shani Gochar: ज्योतिष शास्त्रानुसार शनी हा सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो, कारण तो व्यक्तीला त्यांच्या कर्मांनुसार फळ देतो. त्यामुळे त्यांना न्यायाचा देव आणि कर्मफळदाता असेही म्हटले जाते. शनी हा सर्वात हळू गतीने चालणारा ग्रह आहे. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. त्यामुळे त्याचा परिणाम १२ राशींवर बराच काळ दिसून येतो.

शनी ठराविक काळानंतर राशी आणि नक्षत्र बदलतो. सध्या शनी मीन राशीत उत्तराभाद्रपद नक्षत्रात आहे. तसेच १७ मे २०२६ पासून शनी आपल्या जन्म नक्षत्र रेवतीमध्ये प्रवेश करणार आहे. शनी बुधाच्या नक्षत्रात आल्यामुळे १२ राशींवर आणि देश-विदेशात त्याचा प्रभाव दिसेल. हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे. जाणून घ्या या राशींविषयी…

वैदिक ज्योतिषानुसार, शनी १७ मे रोजी दुपारी ३ वाजून ३९ मिनिटांनी रेवती नक्षत्रात प्रवेश करेल आणि ९ ऑक्टोबरपर्यंत तिथेच राहील. त्यानंतर पुन्हा उत्तराभाद्रपद नक्षत्रात जाईल.

आकाशातील २७ नक्षत्रांपैकी रेवती हे शेवटचे आणि खूप शुभ, शांत व समृद्धी देणारे नक्षत्र मानले जाते. याचा स्वामी बुध आहे, जो शनीचा मित्र मानला जातो. त्यामुळे शनशनी या नक्षत्रात आल्यावर अनेक क्षेत्रात लाभ मिळू शकतो. सुख-समृद्धी, परदेश, अध्यात्म आणि धन-वैभव मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मानही वाढू शकतो. मात्र रेवती हे गंडमूल नक्षत्र असल्यामुळे शनी येथे आल्यावर आयुष्यात काही अडथळे, मंद गती, आत्मचिंतन आणि बदल येऊ शकतात. पण बुधाच्या प्रभावामुळे परिणाम परिस्थितीनुसार बदलू शकतात.

वृषभ राशीवर शनी रेवती नक्षत्राचा प्रभाव (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनी रेवती नक्षत्रात जाणे फायदेशीर ठरू शकते. शनी हा योगकारक ग्रह आहे आणि बुध धन व संतती भावाचा स्वामी आहे. शनी या राशीच्या गोचर कुंडलीत ११व्या भावात आहे. त्यामुळे उत्पन्न वाढू शकते. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. सरकारी काम, सार्वजनिक क्षेत्र आणि मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये फायदा होईल. यामुळे व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तसेच परदेशातून संधी मिळू शकतात. करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते. मात्र मानसिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे तो संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा.

मिथुन राशीवर शनी रेवती नक्षत्राचा प्रभाव (Gemini Zodiac)

मिथुन राशीसाठी शनी दशम भावातून जात आहे. बुधाच्या रेवती नक्षत्रात आल्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये जलद बदल होऊ शकतात. नोकरीत चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या कामाचं कौतुक होईल. परदेशाशी संबंधित कामांमध्ये संधी मिळू शकते. मात्र वैवाहिक जीवनात थोड्या अडचणी येऊ शकतात, त्यामुळे संयमाने आणि शांततेने जोडीदाराशी संवाद साधा.

कन्या राशीवर शनी रेवती नक्षत्राचा प्रभाव (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी शनी रेवती नक्षत्रात जाणे लाभदायक ठरू शकते. या राशीच्या गोचर कुंडलीत शनी सप्तम भावातून जाईल. त्यामुळे जीवनातील अनेक क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसू शकतात. व्यवसायात चांगला फायदा मिळू शकतो. तुमच्या योजना यशस्वी ठरू शकतात. पार्टनरशिप व्यवसायातही लाभ होईल. करिअरमध्ये प्रगती होईल. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)