17th June Panchang & Rashi Bhavishya Marathi: १७ जून २०२४ ला ज्येष्ठ महिन्यातील पहिली एकादशी आहे. शुक्ल पक्षातील ही एकादशी तिथी सोमवारी पूर्ण दिवस व रात्र असणार आहे. सोमवारी दुपारी १ वाजून ५० मिनिटांपर्यंत चित्रा नक्षत्र जागृत असणार आहे, तर रात्री ९ वाजून ३५ मिनिटांपर्यंत परीघ योग जुळून येणार आहे. आजच्या दिवशी सूर्य मिथुन राशीत आणि चंद्र तूळ राशीत असणार आहे. आज तब्बल ५६ मिनिटांचा अभिजात मुहूर्त असणार असून त्याची वेळ सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांपासून ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असेल. सकाळी ७ वाजून ८ मिनिटांपासून ते ८ वाजून ५३ मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे मात्र उर्वरित दिवस आपल्यासाठीही शुभ असेल. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या नशिबात काय लिहून ठेवलाय हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-कौटुंबिक चर्चेला प्राधान्य द्यावे. घरात काही नवीन बदल करण्याचा विचार कराल. कामातून मनाजोगे समाधान लाभेल. आळस झटकून टाकावा. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.

वृषभ:-परदेशातील आप्तांकडून शुभ वार्ता मिळतील. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. प्रत्येक गोष्टीचा रसास्वाद घ्याल. जवळच्या मित्राची नाराजी दूर करावी. मधुर वाणीने सर्वांना जिंकून घ्यावे.

मिथुन:-उगाचच निषेध नोंदवायला जाऊ नका. बौद्धिक चर्चेत सहभाग घ्याल. स्वत:चे मत ठसवून सांगा. अती चिकित्सा करू नका. वेळेचे योग्य नियोजन करा.

कर्क:-कौटुंबिक कामातून आनंद मिळेल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. मनाजोगी खरेदी करता येईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. तब्येतीत सुधारणा होईल.

सिंह:-लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. दिवस मध्यम फलदायी राहील. किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कलेचे कौतुक केले जाईल. नवीन लोक संपर्कात येतील.

कन्या:-उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. वादाच्या मुद्द्यापासून दूर राहावे. पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल. सकारात्मक विचारांची जोड द्यावी.

तूळ:-आजचा दिवस चांगला जाईल. कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील. उत्साह कमी पडू देऊ नका. नातेवाईकांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल.

वृश्चिक:-नवीन कामातून समाधान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वैवाहिक सौख्याने सुखावून जाल. छोट्या प्रवासाचे बेत आखाल. काही किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील.

धनू:-अडचणीतून मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे. कौटुंबिक खर्च वाढू शकतात. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

मकर:-धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. घरातील वातावरण मंगलमय राहील. भावंडांची चिंता लागून राहील. निरूत्साही भावना काढून टाका. शांत व संयमी विचार करावा.

कुंभ:-संपर्कातील लोकांची मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवून विचार कराल. घरातील स्वच्छतेबाबत दक्षता बाळगाल. बागकामाची आवड जोपासाल.

हे ही वाचा<< २१ की २२ जून, वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी आहे? ३ मोठे राजयोग बनल्याने ‘या’ राशींच्या आर्थिक, वैवाहिक जीवनात येईल सुख

मीन:-क्रोध वृत्तीला आवर घालावी. जोमाने कामे पूर्ण कराल. मेहनतीला कमी पडू नका. सारासारविचार करून वागणे ठेवा. स्वतंत्र वृत्तीचा आग्रह धराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17th june panchang marathi rashi bhavishya abhijaat muhurta aries and pisces horoscope jyeshtha ekadashi money astrology svs